तुम्ही कशाला वाढीव करायला आलात? पुणे उपमहापौरांच्या कार्यालयात आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:59 IST2026-03-28T09:57:18+5:302026-03-28T09:59:08+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील एक लहान मंडप काढल्याने ताडीवाला रस्ता परिसरात कार्यकर्ते नाराज झाले होते

Why did you come to get a raise? RPI workers clash at Pune Deputy Mayor's office | तुम्ही कशाला वाढीव करायला आलात? पुणे उपमहापौरांच्या कार्यालयात आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

तुम्ही कशाला वाढीव करायला आलात? पुणे उपमहापौरांच्या कार्यालयात आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी टाकलेला मंडप काढल्याची तक्रार आरपीआयचे कार्यकर्ते घेऊन उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे आले होते. त्यावेळी उपमहापौर कार्यालयातील उपस्थित आरपीआयच्या दुसऱ्या गटाने तुम्ही वाढीव करायला आला का? असे बाेलले. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महापालिकेचा एकच मंडप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध संघटना कार्यकर्त्यांनी बॅनर, लहान स्वागत मंडप लावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील एक लहान मंडप काढल्याने ताडीवाला रस्ता परिसरात कार्यकर्ते नाराज झाले. याबाबत नाराज कार्यकर्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे तक्रार घेऊन आले होते. त्यावेळी वाडेकर यांच्या दालनात अनेक आंबेडकरवादी कार्यकर्ते बसले होते. एका कार्यकर्त्याने तुम्ही कशाला वाढीव करायला आलात? असा सवाल केला. यावरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होऊन हाणामारी झाली.

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक मंडप महापालिकेने काढल्याने काही कार्यकर्ते ही तक्रार घेऊन माझ्याकडे आले होते. ताडीवाला रस्ता भागातील कार्यकर्ते होते. माझ्या दालनात बसलेल्या एकाने त्यांना काहीतरी बोलले त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली. यापूर्वीचे काहीतरी वादाला कारण असू शकते. - परशुराम वाडेकर, उपमहापौर, पुणे महापालिका

Web Title : पुणे के उप महापौर कार्यालय में आरपीआई कार्यकर्ताओं में झड़प।

Web Summary : पुणे के उप महापौर कार्यालय में डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती के लिए लगाए गए तम्बू को हटाने को लेकर आरपीआई कार्यकर्ताओं में झड़प हो गई। हस्तक्षेप के आरोपों के बाद मौखिक विवाद मारपीट में बदल गया।

Web Title : RPI workers clash at Pune Deputy Mayor's office over tent removal.

Web Summary : RPI workers clashed at Pune Deputy Mayor's office over the removal of a tent erected for Dr. Babasaheb Ambedkar Jayanti. A verbal argument escalated into a physical altercation after accusations of interference.