शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

तू मला शिवी का दिली? पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर जीवघेणा हल्ला; कोयता डोक्यात अडकला, डॉक्टरांनी वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:23 IST

गंभीर अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया करून कोयता काढला आणि तरुणाचे प्राण वाचवले.

शगुप्ता शेख 

पुणे : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुणांमधील किरकोळ वादातून हिंसक हल्ल्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत वाघोली परिसरात एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आरोपीने केलेला एक वार इतका जोरदार होता की कोयता थेट तरुणाच्या डोक्यात अडकला. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया करून कोयता काढला आणि तरुणाचे प्राण वाचवले.

ही धक्कादायक घटना १२ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वाघोली येथील रायसोनी कॉलेज गेटसमोरील ‘अखंड अमृततुल्य’ हॉटेलजवळ घडली. नागेश सुनिल जगताप असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागेश हा आपल्या मित्रासोबत हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबला असताना आरोपी मंगेश सांगळे आणि पवन राठोड हे दोघे तेथे आले.

‘तू मला शिवी का दिलीस?’ असा सवाल करत आरोपींनी नागेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. किरकोळ वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात आरोपींनी नागेशवर कोयत्याने सपासप वार केले. त्यापैकी एक वार इतका भयंकर होता की कोयता नागेशच्या डोक्यात अडकून राहिला.

हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमी अवस्थेत असलेल्या नागेशला त्याच्या मित्रांनी आणि स्थानिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करून शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्याच्या डोक्यात अडकलेला कोयता बाहेर काढला. सुदैवाने नागेशचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये आरोपी तरुणावर कोयत्याने हल्ला करताना स्पष्ट दिसत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणात मुख्य आरोपी मंगेश सांगळे आणि पवन राठोड यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली असून हल्ल्यामागील नेमके कारण काय होते आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. सध्या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: College student attacked over abuse; doctors save life.

Web Summary : In Pune, a college student was brutally attacked with a sickle over an argument. The sickle got lodged in his head. Doctors successfully removed it, saving his life. Two accused have been arrested.
टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर