दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले? अजितदादांच्या टीकेवर कोल्हेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 14:54 IST2023-12-25T14:52:44+5:302023-12-25T14:54:03+5:30

तेव्हा जर माझं काही चुकलं असत तर अजितदादांनी तेव्हाच कान धरले असते, ते आता का बोलले

Why did Dada talk about those 5 years now? amol kolhe question on ajit pawar criticism | दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले? अजितदादांच्या टीकेवर कोल्हेंचा सवाल

दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले? अजितदादांच्या टीकेवर कोल्हेंचा सवाल

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनीपुणे दौऱ्यावर असताना खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव घेता टीका केली होती. ५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. अशी टीका केली होती. त्याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी सवाल उपस्थित केला आहे. दादांनी तेव्हाचा मुद्दा आता का उपस्थित केला आहे असं कोल्हे म्हणाले आहेत. 

कोल्हे म्हणाले,  दादांनी माझाही नेहमीच पाठराखण केली आहे. आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेतृत्वावर बोलणं माझ्यासाठी उचित ठरणार नाही. काही चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार आहे. पहिल्याच टर्म मध्ये २ वेळा संसदरत्न मिळाला, बैलगाडा शर्यत प्रश्न सोडवला, संसदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, तेव्हा जर काही चुकलं असत तर त्यांनी कान धरले असते. कोविडच्या काळात दादा सर्वाधिक बैठक घेत होते. त्यावेळी कोण अटेंड्स करत होत. हे त्यांनाही माहित आहे. इंद्रायणी प्रकल्प कोणी पुढाकार घेतला हे दादांना माहित असेलच. चार पाच वर्षात मी काम केलं नसत तर त्यांनी तेव्हाच माझे कान धरले असते. ते आता का बोलले हा प्रश्न मला पडतोय.

काय म्हणाले होते अजितदादा 

५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो. पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे. आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूर मध्ये पर्याय देणार तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडून च आणणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दाखवला आहे. 

Web Title: Why did Dada talk about those 5 years now? amol kolhe question on ajit pawar criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.