पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:28 IST2025-12-04T11:26:36+5:302025-12-04T11:28:26+5:30
पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांनी अटक केली.

पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने ही जमीन घेतली होती. या प्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप झाले होते. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती. दरम्यान, काल रात्री पुणेपोलिसांनी तेजवाणी यांना अटक केली आहे.
तेजवाणी यांची पोलिसांनी दोनवेळा चौकशी केली. या चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. आज कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे.
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार त्यांच्याकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक केल्यामुळे अटक केली आहे.
तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री, पोलीस तपासातून समोर आले आहे. तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा ७/१२ बंद असताना सुद्धा व्यवहाराच्या वेळी जोडला होता. शीतल तेजवानी विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
शीतल तेजवाणी कोण आहे?
पुण्यातील शीतल तेजवाणी आणि सागर तेजवाणी हे पती पत्नी आहेत, सागर आणि शीतल यांनी बँकांकडून दहा कर्जे घेतली आहेत. या कर्ज प्रकरणात त्यांनी बनावट कागदपत्रे जोडली आहेत. हे कर्ज पुणे आणि पिंपरी -चिंचवड येथील सेवा विकास बँकेच्या शाखेतून कर्ज घेतले. ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले त्यासाठी ते वापरलेच नाही.
तेजवानी यांचा हा घोटाळा २०१९ मध्ये समोर आला होता. २०२३ मध्ये त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयावर छापा टाकला होता.