Video: ‘जब तुम मेरे साथ हो तो किसीकी क्या पर्वा’, पुण्यात दुचाकीस्वार प्रेमीयुगुलाचा चाळे करतानाच व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:49 IST2025-07-28T17:48:07+5:302025-07-28T17:49:26+5:30
रस्त्यावरून ये-जा करणारे सगळे लोक त्यांच्याकडे पाहत होते. त्यानंतरही तरुणाने ना गाडी थांबवली, ना तिला मागे बसवले

Video: ‘जब तुम मेरे साथ हो तो किसीकी क्या पर्वा’, पुण्यात दुचाकीस्वार प्रेमीयुगुलाचा चाळे करतानाच व्हिडीओ व्हायरल
पुणे: खेड-शिवापूर परिसरातील महामार्गावरून येणाऱ्या एका दुचाकीस्वार प्रेमीयुगुलाचा चाळे करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. याला जिवापाड प्रेम म्हणायचे की अश्लील चाळे हे नेटकरी सध्या त्यांच्या कॉमेंट्सद्वारे ठरवत आहेत. शिंदेवाडी भागातील खेड-शिवापूर येथील महामार्गावरून पुण्याकडे येताना हा व्हिडीओ पाठीमागे असलेल्या एका कारमधून काढण्यात आला आहे.
एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टँकवर बसली आहे आणि विशेष म्हणजे दुचाकीस्वार तरुण ती दुचाकी चालवत आहे. व्हिडीओमध्ये आजूबाजूने जाणारे वाहनचालक त्यांच्या मोबाइलमध्ये हा व्हिडीओ काढतानादेखील दिसत आहेत. पण, ‘जब तुम मेरे साथ हो तो किसीकी क्या पर्वा’ असे म्हणत हे जोडपं प्रेमात अखंड बुडालं होतं. पुण्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकरी, ही अश्लीलता आहे तर हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं आहे, अशा संमिश्र प्रक्रिया देत आहेत.
असे असताना या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीदेखील जोर धरत आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या तरुणीने तोंडाला स्कार्फ बांधलेला, तर व्हिडीओमध्ये ते दोघे एकमेकांना मिठी मारताना देखील ते दिसत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणारे सगळे लोक त्यांच्याकडे पाहत होते. त्यानंतरही तरुणाने ना गाडी थांबवली, ना तिला मागे बसवले.