वरंधा घाट चढतांना चालकाचा अंदाज चुकला..! कार खड्ड्यात उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:22 IST2025-06-11T12:04:41+5:302025-06-11T15:22:10+5:30

वरंधा घाट चढत असताना चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे आणि कारवरील ताबा सुटल्यामुळे ती रस्त्याशेजारील मोरीवरील खड्ड्यात उलटली.

While climbing the Varandha Ghat, the driver misjudged the situation and the car overturned into a ditch; loss of life was averted | वरंधा घाट चढतांना चालकाचा अंदाज चुकला..! कार खड्ड्यात उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

वरंधा घाट चढतांना चालकाचा अंदाज चुकला..! कार खड्ड्यात उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे - भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात हिर्डोशी येथील हराळीचा माळ या ठिकाणी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे.



अधिकच्या माहितीनुसार, महाडकडून भोरच्या दिशेने येणारी कार (क्र. एम.एच. १४ ई.वाय. ४०८९) घाट चढत असताना चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे आणि कारवरील ताबा सुटल्यामुळे ती रस्त्याशेजारील मोरीवरील खड्ड्यात उलटली. कारमध्ये चालकासह चार जण प्रवास करत होते.  अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदत केली.

किरकोळ दुखापत वगळता सर्व प्रवासी सुखरूप आहे. ते इतर वाहनाने पुढील प्रवासासाठी भोरच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, सध्या भोर–महाड मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असून, संपूर्ण रस्ता खोदण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक एका बाजूने कच्च्या मार्गावरून सुरू आहे, यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.  

Web Title: While climbing the Varandha Ghat, the driver misjudged the situation and the car overturned into a ditch; loss of life was averted