मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:11 IST2025-11-13T14:10:42+5:302025-11-13T14:11:36+5:30

अजित पवारांनी सुद्धा मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते

Which statement should I disclose exactly; Question from Rupali Patil's disclosure letter | मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल

मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल

पुणे: रुपाली पाटील आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे ७ दिवसांच्या आत करावा असे पत्र सरचिटणीस यांच्याकडून पाटील यांना देण्यात आले होते. त्यावरून रुपाली पाटील यांनी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे. असा सवाल उपस्थित करत प्रदेश कार्यालयाला खुलासा पत्र पाठवले आहे.    

पक्षाने मागितलेल्या खुलासा पत्रामध्ये, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे आहे व त्यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा पत्र मागवले आहे. त्याबाबत आपणास खुलासा येणे प्रमाणे राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष यांचे बाबत नक्की कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे. याविषयी नोटीस मध्ये कोणताही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य आपण आपल्या नोटीसीमध्ये नमूद केले असते तर त्यावर मला खुलासा करणे योग्य झाले असते. तसेच राज्य महिला आयोग व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र विभाग आहेत.

त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते. त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसेच लोकांमध्ये अत्यंत रोष, असंतोष निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने केलेले वक्तव्याने पक्षाला सुद्धा रोषाला सामोरे जावे लागत होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतरून मी स्वतः बीड येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटूंबीय व आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजित दादा पवार यांची बोलणे करून दिले होते. त्यावेळी देखील मा. दादांनी मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते. मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझे म्हणणे मांडले होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणे हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्तभंग झालेला नाही.

प्रदेश कार्यालयाकडून नेमका काय खुलासा मागितला होता?  

आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे ७ दिवसांच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके यांच्याकडून रुपाली पाटील यांना देण्यात आली होती. 

Web Title : रूपाली पाटिल ने नोटिस पर सवाल उठाया, बयान पर स्पष्टता मांगी।

Web Summary : रूपाली पाटिल, अनुशासनात्मक कार्रवाई का सामना करते हुए, स्पष्टीकरण की आवश्यकता वाले विशिष्ट बयान पर सवाल उठाती हैं। उनका तर्क है कि उनकी टिप्पणियों ने राज्य महिला आयोग की विवादास्पद टिप्पणियों के बाद पार्टी हितों का बचाव किया, और पार्टी लाइन के प्रति उनकी निष्ठा पर जोर दिया।

Web Title : Rupali Patil questions party notice, seeks clarity on statement.

Web Summary : Rupali Patil, facing disciplinary action, questions the specific statement requiring clarification. She argues her comments defended party interests after controversial remarks by the State Women's Commission, emphasizing her loyalty to the party line.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.