शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

कुठं नेऊन ठेवलंय आमचं सायकलींचं शहर...?

By admin | Updated: November 4, 2014 03:50 IST

बहुतांशी ट्रॅक नादुरुस्त असून, अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकवर अतिक्रमणांचा विळखा आहे. एकेकाळी पर्यावरणपूरक असलेले सायकलींचे शहर कुठे नेऊन ठेवलंय

पुणे : सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनाने केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी विकास (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता रुंदीकरणात उभारलेले सायकल ट्रॅक कागदावरच उरले आहेत. बहुतांशी ट्रॅक नादुरुस्त असून, अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकवर अतिक्रमणांचा विळखा आहे. एकेकाळी पर्यावरणपूरक असलेले सायकलींचे शहर कुठे नेऊन ठेवलंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात जवळपास अर्ध्याहून अधिक सायकल ट्रॅक अतिक्रमणांच्या विळख्यात असताना, दरवर्षी त्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यापलीकडे महापालिका सायकल वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मात्र, काहीच करताना दिसत नाही. शहरात बीआरटी प्रकल्प राबविण्यासाठी सुमारे ३९ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार १२६ किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार होते. रुंदीकरणातील १0४ किलोमीटरचे ट्रॅक पूर्ण झाले आहेत. त्यातील केवळ १० ते १२ किलोमीटरचेच ट्रॅक वापरण्यालायक आहेत. शहरातील स्वारगेट ते हडपसर, स्वारगेट ते कात्रज, नगर रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता या काही प्रमुख रस्त्यांवरील सायकल ट्रॅकची मोठी दुरवस्था झालेली आहे. स्वारगेट ते कात्रज , हडपसर ते स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील सायकल ट्रॅकची सुरुवात अतिक्रमणांच्या विळख्याने होते. तसेच अनेक ठिकाणी पथारी व्यवासायिक व दुकान व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले आहे. एवढेच काय कमी म्हणून महापालिकेच्या कचराकुंड्याही सायकल ट्रॅकवर थाटण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सायकल ट्रॅक शोधण्याची वेळ सायकलस्वारांवर येत असल्याचे चित्र आहे. हडपसर परिसरातील सायकल ट्रॅक ही अतिक्रमणांच्या विळख्यातच आहे. कर्वे रस्ता, कर्वे रस्त्यवारील सायकल ट्रॅकची सुरुवात पार्किंगनेच होते. हा सायकल ट्रॅकही सलग नाही. त्यामुळे अनेकदा नागरिकांना मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागतो, तर काही ठिकाणी सायकल ट्रॅकची दुरवस्था झाली असून, या मार्गावरील अनेक व्यावसायिकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. (प्रतिनिधी)