शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

.. जेव्हा स्मार्ट सिटीतले विद्यार्थी देतात मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा    

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 7:02 PM

दिवसभर काबाडकष्ट करून आयुष्याला आकार देणाऱ्या हातात रात्री लेखणी असते...

ठळक मुद्देसुमारे १७५ विद्यार्थ्यांनी गुरूवारी हिंदी विषयाचा दिला पेपर

पुणे : दिवसभर काबाडकष्ट करून आयुष्याला आकार देणाऱ्या हातात रात्री लेखणी असते. अनंत अडचणींवर मात करत भविष्य उज्ज्वल करण्याची जिद्द घेऊन ही मुलं शिकतात. पण एकीकडे आपण अत्याधुनिक सोयीसुविधांनी स्मार्ट होत असताना या मुलांच्या अडचणी मात्र कमी होत नाहीत. गुरूवारी (दि. १०) रात्री वीज गायब झाल्याने रात्रशाळेतील या विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा द्यावी लागली. तर जनरेटर किंवा इतर पयार्यांचा खर्च शाळेला परवडत नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले.पूना नाईट स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे १७५ विद्यार्थ्यांनी गुरूवारी हिंदी विषयाचा पेपर दिला. परीक्षेची वेळ सायंकाळी ६ ते ९ ही होती. परीक्षा सुरू झाली तेव्हा शाळेत वीज होती. पण पावसामुळे वीज गेल्याने सर्वत्र अंधार पसरला. शाळेकडून आधीच विद्यार्थ्यांना घरून मेणबत्त्या आणण्यास सांगितले होते. तसेच शाळेतही ही पयार्यी व्यवस्था असते. मग प्रत्येक विद्यार्थ्याच्या बेंचवर मेणबत्ती लावण्यात आली. या उजेडात विद्यार्थ्यांनी दोन तास पेपर सोडविला. साडे आठ वाजण्याच्या सुमारास वीज आली, अशी माहिती प्राचार्य अविनाश ताकवले यांनी दिली. सहसा रात्रीच्या वेळी वीज जात नाही. महावितरणकडून नेहमी सहकार्य मिळते. पण गुरूवारी पावसामुळे मोठा बिघाड झाल्याने वीज गेली. शाळेमध्ये पुर्वी वीज गेल्यानंतर कंदील, गॅसबत्यांचा वापर केला जात होता. पण त्याची देखभालीचा खर्च परवडत नाही. जनरेटरचा खर्चही मोठा आहे. शाळेत सध्या आठवी ते बारावीपर्यंतचे ५०० विद्यार्थी आहेत. प्रत्येक वर्गात वीजेची पयार्यी व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे वीज नसल्यास मेणबत्तीचा वापर केला जातो, असे ताकवले यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षाSmart Cityस्मार्ट सिटीSchoolशाळा