शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट सिटीसाठी दर्शन बसला मुहूर्त कधी?

By admin | Updated: March 10, 2015 04:55 IST

उत्पन्नवाढीच्या अपेक्षेने पीसीएमटी - पीएमपीच्या विलीनीकरणानंतर पीएमपीचा जन्म होऊन ७ वर्षे लोटली आहेत. मात्र, पीएमपीकडून अद्यापही पुणे दर्शनच्या

अंकुश जगताप, पिंपरीउत्पन्नवाढीच्या अपेक्षेने पीसीएमटी - पीएमपीच्या विलीनीकरणानंतर पीएमपीचा जन्म होऊन ७ वर्षे लोटली आहेत. मात्र, पीएमपीकडून अद्यापही पुणे दर्शनच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडसाठी पिंपरी-चिंचवड दर्शनची सुविधा देणाऱ्या बसेस उपलब्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे दर्शनला उद्योगनगरीचे वावडे असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे. तर शहराचे बिरुद मिरवणाऱ्या महापालिकेनेही अशा प्रकारचा ठराव पीएमपी प्रशासनाला पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे शहरातील वैभवाच्या, अभिमानाच्या बाबी झाकोळल्या जात असून, ते कोण्या हौशी पर्यटकांची नजर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जुळी शहरे समजल्या जाणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पूर्वी महापालिकांच्या दोन वेगवेगळ्या परिवहन संस्था होत्या. एकाच मार्गावर या दोन्ही संस्थांच्या बसेस एकामागून एक धावत असल्याने प्रवाशांची पळवापळवी, त्यामुळे मागून येणाऱ्या बसला प्रवासी कमी मिळाल्याने होणारे नुकसान अशी कारणे देत दोन्ही संस्थांचे २००७ साली विलीनीकरण केले गेले. यापूर्वीच पुणे शहर परिसरात पुणे दर्शनसाठी वातानुकूलित २ बसद्वारे ही सेवा सुरू होती व आजही आहे. मात्र, पीएमपी स्थापनेनंतरही वेगळी ओळख असलेल्या उद्योगनगरीतील वैभवाच्या व विरंगुळा स्थळांची पाहणी करण्यासाठी या प्रशासनाने अशी सेवा उपलब्ध करण्याचा विचार केला नाही. वास्तविक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पीएमपीने पुढाकार घेत असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, पीएमपीने परावलंबी वृत्तीने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून काही मिळतेय का, याचा विचार करीत बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या कामी बससाठी खर्चासाठी छदामाचीही तरतूद केलेली नाही. यासाठी साधे सर्वेक्षणही केले नसल्याचे उघड होत आहे. त्याचबरोबर महापालिकेनेही पीएमपीला असा ठराव अद्याप पाठविला नाही.परिणामी, शहरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची कुचंबना होत आहे. त्यांना शहरात फिरण्यासाठी रेल्वे, बस, रिक्षा, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी जादा पैसे खर्चण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. याचबरोबर पुण्यासह पिंपरी-चिंचवड पाहण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यासाठी स्वतंत्ररीत्या तजवीज करावी लागत आहे.