शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटना घडल्यानंतरचे शहाणपण काय कामाचे?

By admin | Updated: June 29, 2015 06:33 IST

मालाड मालवणी येथे विषारी दारू पिल्याने शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर राज्यभर पोलिसांची धावपळ उडाली. ठिकठिकाणच्या दारूभट्ट्या उद््ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

संजय मानेमालाड मालवणी येथे विषारी दारू पिल्याने शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर राज्यभर पोलिसांची धावपळ उडाली. ठिकठिकाणच्या दारूभट्ट्या उद््ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील पोलीसही त्यास अपवाद ठरले नाहीत. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून अशा जीवघेण्या हातभट्ट्या उभ्या राहणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर उशिरा सुचणारे शहाणपण काय कामाचे, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. दारूनिर्मितीसाठी आवश्यक रसायनसाठा असलेल्या ठिकाणी निराधारनगरमध्ये दोन वर्षांपूर्वी ठिणगी पडून आग लागली. झोपड्या आगीत खाक झाल्या. तेथील महिला, रहिवासी भाजले. दारूसाठ्याच्या ठिकाणी छापा टाकण्यास गेलेले उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारीसुद्धा आगीत भाजून मृत्युमुखी पडले. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर अशा बेकायदा दारूभट्ट्या, हातभट्टी दारूनिर्मितीचे अड्डे पिंपरी-चिंचवडमधून तेव्हाच हद्दपार होणे आवश्यक होते. मालवणी अथवा राज्यात अन्य ठिकाणी विषारी दारू दुर्घटना घडावी, नंतर कारवाईची पावले उचलावीत, अशी येथील पोलिसांना प्रतीक्षा करण्याची काही गरज नव्हती. मालवणीतील दुर्घटनेनंतर विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांवर गुन्हे दाखल केले. मुद्देमाल जप्त केला. परंतु, त्या ठिकाणी पुन्हा काही दिवसांतच दारूभट्ट्या सुरू होतील. आणखी कोठे तरी दुर्घटना घडून येईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, हे सर्वांना ज्ञात झाले आहे. विषारी दारूने अनेकांचा बळी जातो. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर संसार उघड्यावर पडतात. केवळ विषारी दारूच्या दुर्घटनाच नव्हे, तर असे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यातही अनेकांचे बळी जात आहेत. संसार उद्ध्वस्त होत आहेत. ते रोखण्याची जबाबदारी पोलिसांची नाही का? असा मुद्दा या अनुषंगाने उपस्थित झाला आहे. मटका, जुगाराच्या अड्ड्यांवर खुनी हल्ल्याच्या घटना घडतात. अनेकदा खूनही पडतात. अनेक जण जुगारात हरतात. संसाराची वाताहात होते . समाजहिताला बाधा आणणारे हे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणेला कशाची प्रतीक्षा आहे? असे प्रकार सुरू असल्याची माहिती बाळगणारे, अवैध धंदे बंद करा, अशी मागणी करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांच्या नावाच्या याद्या मटकेवाल्यांकडे जमा होतात. त्यांना वेळचेवेळी हप्ते मिळतात. कोणी आवाज उठवीत नाही, कोणाची तक्रार नाही, म्हणून पोलीससुद्धा काही करीत नाहीत. -