कोंडीतून सुटकेसाठी कंबर कसली

By Admin | Updated: June 11, 2015 06:09 IST2015-06-11T06:09:16+5:302015-06-11T06:09:16+5:30

पर्यटननगरी लोणावळा शहरात वाहतूककोंडी ही सर्वात मोठी व जटिल समस्या आहे़ ही समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन व लोणावळा नगर

What is the waist to escape from the prison? | कोंडीतून सुटकेसाठी कंबर कसली

कोंडीतून सुटकेसाठी कंबर कसली

लोणावळा : पर्यटननगरी लोणावळा शहरात वाहतूककोंडी ही सर्वात मोठी व जटिल समस्या आहे़ ही समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन व लोणावळा नगर परिषद यांनी कंबर कसली असून, शनिवारपासून (दि़ १३) शहरात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ याकरिता शहरातील रस्त्यांचा सर्व्हे करून २००४ मध्ये लोणावळा नगर परिषदेने केलेल्या ठरावाप्रमाणे तसेच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत शहरात पार्किंग, नो पार्किंग, तसेच रस्त्यांवर पट्टे मारणे, हातगाडी व पथारीधारक, तसेच हॉटेल व दुकानदारांची अतिक्रमणे हटविणे आदी कामे येत्या तीन दिवसांत नगर परिषद करणार आहे़
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा व तोडगा काढण्यासाठी मंगळवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आय़एस़पाटील यांनी नगरसेवकांची बैठक घेतली़ या वेळी उपमुख्याधिकारी शिवाजी मेमाणे, उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, नगरसेवक श्रीधर पुजारी, राजू बच्चे आदी उपस्थित होते़
शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते़ ती सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. (वार्ताहर)

Web Title: What is the waist to escape from the prison?