शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पिंपळेतल्या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय?, विषारी औषध टाकल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 6:36 PM

पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही.

ठळक मुद्देफळबागांचे नुकसान : मुलांच्या अंगावर दिसतायत लालसर चट्टे तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार

पुणे : पुरंदर तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. तसेच विहिरींचा पाणीसाठाही आटू लागला आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. मात्र, तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही. परंतु , या फेसाळलेल्या दूषित पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतातील पेरू, सिताफळ आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.      पिंपळे (ता. पुरंदर) येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पेरू, सिताफळ आणि आंब्याचे पीक घेत आहेत. फळबागांसाठी या दोन्ही शेतकऱ्यांनी साडेसहा एकर क्षेत्रात सामूहिक विहीर तयार केली आहे. त्याच विहिरीवर हे दोन्हीही शेतकरी आपल्या बागांना पाणी देतात. मात्र, २ दिवसांपूर्वी अनंता क्षीरसागर हे पहाटे फळबागांना पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना अचानक विहिरीतील पाण्यावर फेस आल्याचे दिसले. त्या वेळी त्यांना या फेसामागचे गूढ उकलले नाही. त्यांनी विहिरीतील हेच फेसाळलेले पाणी पेरू, सीताफळ आणि आंब्याच्या बागांना दिले, त्यामुळे या दूषित पाण्यामुळे संपूर्ण पीक पिवळे पडून जळायला लागले आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे या शेतकऱ्यांच्या घरातील महिला आणि लहान मुलांच्या अंगावर लालसर चट्टे पडून त्यांंना त्वचेचे विकार जडले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शेतातील पिकांसोबत जनावरांनाही या दूषित पाण्याचा त्रास होत आहे.विहिरीत कुणीतरी विषारी औषध टाकल्याचा संशय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यापूर्वीही या शेतकऱ्यांच्या शेतातील वीजवाहक वायर कापून वीज खंडित करण्याचा काही अज्ञातांनी प्रयत्न केला होता.शिवाय काढणीला आलेल्या गव्हाच्या पेंढीत छोटे दगड ठेवून त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता, त्या वेळी या शेतकऱ्यांनी या दोन्ही घटनांकडे दुर्लक्ष केले होते. या वेळी मात्र त्यांनी यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनंता क्षीरसागर व विठ्ठल खेनट यांंनी केली आहे. 

....................................

याबाबत तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार असून, नुकसानीनुसार त्यांना मदत दिली जाईल. तसेच दूषित पाण्याचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.  - देवेन्द्र ढगे, तालुका कृषि अधिकारी,पुरंदर 

टॅग्स :PurandarपुरंदरWaterपाणीFarmerशेतकरी