सिगारेट न दिल्याने कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 20:19 IST2025-02-05T19:56:44+5:302025-02-05T20:19:41+5:30
पिंपरी : सिगारेट न दिल्याने तरुणाने एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. ४) रात्री साडेसात वाजता ...

सिगारेट न दिल्याने कोयत्याने वार
पिंपरी : सिगारेट न दिल्याने तरुणाने एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. ४) रात्री साडेसात वाजता सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे घडली.
रंगनाथ जगदेश गुत्तेदार (४०, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष धुळे जाधव (२८, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंगनाथ हे सृष्टी चौकात सिगारेट ओढत थांबले होते.
त्यावेळी संशयित संतोष तिथे आला. त्याने रंगनाथ यांच्याकडे सिगारेट मागितली. सिगारेट देण्यास रंगनाथ यांनी नकार दिला. त्या कारणावरून संतोष याने कोयता काढून रंगनाथ यांच्यावर वार करत त्यांना जखमी केले.