काय सांगता! डावखुरी असल्याने विवाहितेचा छळ; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:42 AM2021-01-18T11:42:21+5:302021-01-18T12:11:11+5:30

उजव्या हाताने काम करण्याची सक्ती

What do you say! Marital harassment for being left-handed; Incidents in Pune | काय सांगता! डावखुरी असल्याने विवाहितेचा छळ; पुण्यातील घटना

काय सांगता! डावखुरी असल्याने विवाहितेचा छळ; पुण्यातील घटना

Next


पुणे : विवाहानंतर त्यांना आपली पत्नी डावखुरी असल्याचे समजले. त्यावरुन त्याने व त्याच्या आईने विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला उजव्या हाताने काम करण्याचे असा दम देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या फिर्यादीनंतर वानवडीपोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी झाला होता. त्यानंतर ती शेवाळवाडी फाटा येथे पतीच्या घरी आली. पती व सासूला ती डावखुरी असल्याचे समजले. त्यांनी तू डावखोरी आहे, असे म्हणून उजव्या हाताने काम करायचे आहे, असे दम भरुन मानसिक व शारीरीक त्रास दिला. तसेच पतीने तुझ्या वडिलांकडून २ लाख रुपये घेऊन ये. नाही तर घटस्फोट देईल, असे म्हणून मारहाण केली. तसेच पतीने तिच्याशी संबंध ठेवले नाही. फिर्यादीच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज केले. पोलीस उपनिरीक्षक पंढरकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: What do you say! Marital harassment for being left-handed; Incidents in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.