शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

जे आवडतं ते पेरायचं आणि तेच खायचं...! रुद्ररुप मित्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:08 PM

जमिनीशिवाय केवळ पाण्याच्या मदतीने वनस्पती वाढविण्याची कला म्हणजे हायड्रोपोनिक्स होय.

ठळक मुद्देहायड्रोपोनिक्सच्या तंत्राने कमी जागेत पिकवा पालेभाज्या 

पुणे : शुध्द नैसर्गिक पध्दतीने पिकविलेल्या पालेभाज्या खाणे सध्याच्या काळात अवघड झाले आहे. विविध रासायनिक खतांचा मारा करुन कमी कालावधीत भरघोस वाढ झालेल्या पालेभाज्या खाल्या जात आहेत. पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणा-या रुद्ररुप मित्रा यांनी आपल्या घरातच केवळ नारळाच्या कवटीच्या पावडरच्या मदतीने वेगवेगळ्या पिकांची घरगुती शेती सुरु केली आहे.  ‘‘जे आवडतं ते पेरायचं आणि तेच खायचं.’’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या या अभिनव प्रयोगाला व्यापक रुप देण्याचे ठरवले आहे.    हायड्रोपोनिक्स या तंत्राचा त्यांनी आपल्या घरगुती शेतीकरिता उपयोग केला आहे. ‘जमिनीशिवाय केवळ पाण्याच्या मदतीने वनस्पती वाढविण्याची कला’’ म्हणजे हायड्रोपोनिक्स होय. या तंत्राविषयी अधिक माहिती घेण्याकरिता रुद्ररुप यांना विचारले असता ते म्हणाले, हायड्रोपोनिक्स नावाची कला बँबिलॉन संस्कृ तीमध्ये आढळुन येते. त्यावेळच्या लोकांनी तिचा योग्यपध्दतीने उपयोग करुन घेतला. आता पुन्हा नव्याने हे शास्त्र उपयोगात आणायचे कारण म्हणजे आपल्याला पूर्णपणे नैसर्गिकदृष्ट्या पिकविलेल्या पालेभाज्या किंवा फळभाज्या मिळत नाही. त्या हव्या असल्यास जादा किंंमत देऊन घ्याव्या लागतात. दुसरे म्हणजे त्याक रिता खुप शोधाशोध देखील करावी लागते. मध्यंतरीच्या काळात गच्चीवर, परसबागेत शेती पिकविण्यास प्राधान्यक्रम दिला जात होता. मुळात आता आपल्याकडे जागेची कमतरता हा मुख्य प्रश्न आहे. शहरात बहुतांशी लोक इमारतींमध्ये राहत असल्याने त्यांना जागेकरिता कायम तडजोड करावी लागते. अशावेळी घरातील खिडकीजवळ किंवा ज्याठिकाणी पुरेशा प्रमाणात प्रकाश येतो अशा जागी असलेल्या कपाटाला प्लास्टिक अथवा काचेची बाटली अडकवून त्यात केवळ पाण्याच्या साह्याने आपल्या आवडीच्या भाजीचे पीक घेता येईल. ही कल्पना सुचली आणि प्रयत्नाने ती प्रत्यक्षात आणली गेली.     पुण्यात खुप शोधाशोध केल्यानंतर देखील हायड्रोनिक्स या तंत्राविषयी काहीच माहिती उपलब्ध नसल्याने बंगलोरमध्ये त्याविषयी कार्यशाळा होत असल्याची माहिती मित्रा यांना  मिळाली. मात्र ती कार्यशाळा पूर्ण करता आले नाही. या विषयाची लहानपणापासूनच आवड असल्याने त्यांनी स्वअध्ययनातून माहिती मिळवली. ते स्वत: हायड्रोपोनिक्स संबंधी कार्यशाळा घेतात. आतापर्यंत दोन कार्यशाळा झाल्या असून पहिल्या कार्यशाळेकरिता 12 तर दुस-या कार्यशाळेत 25 जण सहभागी झाल्याचे ते आवर्जुन सांगतात. ...............* हायड्रोपोनिक्स या तंत्राच्या मदतीने मित्रा यांनी आपल्या परसबागेत मिरची, पालक, टोमँटोचे पीक घेतले आहे. त्याकरिता त्यांनी घरातील वापरात नसलेल्या प्लँस्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करण्यात आला. त्या अर्धवट कापून त्यात नारळाच्या कवटीच्या पावडरचा उपयोग क रुन पाण्याच्या आधारावर आपल्याला हवी ती भाजी पिकवता येते. ....................................* माती नव्हे पाण्याच्या मदतीने घेतले पीक पीकांना आवश्यक असलेली पोषणद्रव्ये त्यांना योग्य त्या प्रमाणात मिळाल्यास त्यांची जोमदार वाढ होते.  ती पोषणद्रव्ये मित्रा यांनी मातीच्या नव्हे तर पाण्याच्या माध्यमातून दिली. हायड्रोपोनिक्स तंत्रात दोन प्रकारचे पोषणद्रव्यांचा उपयोग केला जातो. मायक्रोन्युट्रीएंटस (नायट्रोजन, फॉस्फरस, पॉट्ँशिएम) मायक्रोन्यट्रीएंटस (बोरॉन, कँलशिएम, क्लोरीन) या दोन्ही प्रकारांमध्ये मुलद्रव्य घटकांचा समावेश होतो. ही घटकद्रव्ये बाजारात एक त्रित स्वरुपात उपलब्ध आहेत. ती पाण्यात विरघळण्यात येतात.  आपल्या हव्या त्या पीकाकरिता माती ऐवजी नारळाच्या कवटीच्या भूकटीचा उपयोग केला जातो. पीकाच्या मुळांना पाण्यातून सर्वप्रकारची पोषणद्रव्ये दिली जातात. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीHealthआरोग्य