Pune: वडिलांना जेवणाचा डब्बा द्यायला गेला, दुचाकी स्लीप झाल्याने जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 10:21 IST2024-03-11T10:21:05+5:302024-03-11T10:21:17+5:30

घरी परतत असताना घोरपडीगावातील अनंत टॉकीजसमोरून त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडले...

Went to give lunch box to father, lost his life when bike fell asleep | Pune: वडिलांना जेवणाचा डब्बा द्यायला गेला, दुचाकी स्लीप झाल्याने जीव गमावला

Pune: वडिलांना जेवणाचा डब्बा द्यायला गेला, दुचाकी स्लीप झाल्याने जीव गमावला

पुणे : वडिलांना जेवणाचा डब्बा देऊन निघालेल्या तरुणाची दुचाकी स्लिीप होऊन त्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. बबलू हरिप्रसाद वर्मा (वय ३८, रा. घोरपडीगाव) असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिस हवालदार मेघांत सचिन लक्ष्मण मेमाणे यांनी फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, दुचाकीस्वार बबलू हे महंमदवाडी येथे त्यांच्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेले होते. घरी परतत असताना घोरपडीगावातील अनंत टॉकीजसमोरून त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडले. त्यांच्या हाताला, तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया झाल्यावर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Went to give lunch box to father, lost his life when bike fell asleep