मित्रांसोबत पोहायला गेला अन् जीव गमावला; आजी-आजोबांना भेटायला आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 12:54 IST2023-05-08T12:53:28+5:302023-05-08T12:54:13+5:30

मुळा मुठा कालव्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेल्यावर कालव्यात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला

Went swimming with friends and lost his life The unfortunate death of a young man who came to visit his grandparents | मित्रांसोबत पोहायला गेला अन् जीव गमावला; आजी-आजोबांना भेटायला आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मित्रांसोबत पोहायला गेला अन् जीव गमावला; आजी-आजोबांना भेटायला आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे राहत असलेल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी आलेल्या बावीस वर्षीय युवकाचा मुळा मुठा कालव्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना रामदरा परिसरात रविवारी (दि.०७) दुपारी साडे तीनच्या दरम्यान उघडकीस आली आहे. झहीर समिर सय्यद (अंदाजे वय - २२ मु. पो. बारामती, फलटण नाका, निलम पेलेस) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झहीर सय्यदचे आजी आजोबा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती या परिसरात राहतात. तसेच झहीर हा भारत फोर्स या नामांकित कंपनीत कामाला होता. रविवारी रामदरा परिसराकडे जाणाऱ्या मुळा मुठा कालव्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने कालव्यात उडी मारल्यावर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या वरती येऊ शकला नाही. त्याची सर्वत्र शोधाशोध केली असता कोठेही दिसून आला नाही. दरम्यान, सोमवारी (दि. ०८) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह हा लोणी काळभोर हद्दीतच वाहून जाताना दिसून आला. यावेळी लोणी काळभोर पोलीस, लोणी काळभोर ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला. लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरु केली असून तपास सुरु आहे.

Web Title: Went swimming with friends and lost his life The unfortunate death of a young man who came to visit his grandparents