देवदर्शनासाठी गेले अन् घरी चोरांनी हात केला साफ; साडेदहा लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 21:12 IST2025-10-30T21:11:39+5:302025-10-30T21:12:29+5:30
बाणेर परिसरातील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांनी २३ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देवदर्शनासाठी गेले अन् घरी चोरांनी हात केला साफ; साडेदहा लाखांचा ऐवज लंपास
पुणे : घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधत चोरांनी घरफोडी करून साडेदहा लाखांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबत किरण प्रमोदकुमार झा (रा. खेसे पार्क, लोहगाव, मूळ रा. बिहार) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झा हे कुटुंबीयांसह २१ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत रोजी काशी विश्वनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, चोरांनी घरात कुणीच नसल्याची संधी साधत १० लाख ५१ हजार ९३ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी ढवळे करत आहेत.
किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी
बाणेर परिसरातील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांनी २३ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हेमंत चौधरी (रा. मोकाई वस्ती, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे महाराष्ट्र फूड्स नावाने बाणेर परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. बुधवारी (दि. २९) त्यांचे दुकान बंद असताना चोरांनी शटर उचकटून २३ हजार रुपये चोरून नेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रायकर करत आहेत.