'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:31 IST2025-08-01T17:30:58+5:302025-08-01T17:31:42+5:30
तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे

'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा
पुणे (यवत) : यवतमध्ये सकाळी एका तरूणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला यवत पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. मात्र काही वेळातच संतप्त झालेल्या जमावाने वाहनांची तोडफाड व जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या आता यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे आणि अशा घटना घडवताना पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
फडणवीस म्हणाले, या घटनेची सगळी माहिती घेतली आहे. बाहेरच्या व्यक्तीने चुकीच स्टेटस ठेवल्याने आणि पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला. आणि लोक रस्त्यावर आले. काही ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. आता परिस्थिती नियत्रणात आहे. दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसली आहेत. तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे आणि अशा घडवताना पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. काल सभा म्हणून असे स्टेट्स ठेवण्याची मुभा दिली आहे का? असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. चुकीच्या पद्धतीने धर्मावर अवलंब करणाऱ्यांवर टीका करण्याचे अधिकार नाहीत. सभेचं आणि याच कारण जोडण्याचं कारण नाही. सभा झाली म्हणून आम्ही असे केले अस कुणी म्हणत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आता ते व्हिडिओ तिथले आहे की बाहेरचे हे बघावे लागेल ,अशावेळी अनेकवेळा बाहेरचे व्हिडिओ टाकले जातात. या सगळ्या घटनेची चौकशी केली जाणार. सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कुणीही कायदा हातात घेतले नाही पाहिजे. कुणीही बेकायदेशीर कृत्ये करत असतील तर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.