पिंपळे शाळेत झालेल्या संस्कारामुळे जीवनात यशस्वी झालो : राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:45+5:302021-02-05T05:05:45+5:30

पुरंदरमधील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या पिंपळे येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालयाची इमारतीतील प्रयोगशाळेचे धोंडीबा दशरथ पोमण असे नामकरण ...

We succeeded in life due to the rites performed at Pimple School: Rahul Jadhav | पिंपळे शाळेत झालेल्या संस्कारामुळे जीवनात यशस्वी झालो : राहुल जाधव

पिंपळे शाळेत झालेल्या संस्कारामुळे जीवनात यशस्वी झालो : राहुल जाधव

पुरंदरमधील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या पिंपळे येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालयाची इमारतीतील प्रयोगशाळेचे धोंडीबा दशरथ पोमण असे नामकरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. नीलकंठ धोंडिबा पोमण यांनी दिलेल्या देणगीतून ही इमारत उभी राहिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते हे होते. यावेळी शांताराम पोमण, शिवाजी पोमण, नीलकंठ पोमण, कोतवाल, माई कोलते, साहित्य परिषद सासवडचे अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब खाडे, कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, ॲड. कला फडतरे, रमेश कोतवाल, भुजगराव खेनट, बाळासाहेब मुळीक, प्रमोद पोमण, नितीन पोमण आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक शिवाजी घोगरे यांनी प्रास्ताविक केले. सचिन धनवट यांनी सूत्रसंचालन केले.

--

फोटो ओळी : ०१सासवड शाळा उद्घाटन

फोटो क्रमांक : ०१पुरंदरमधील पिंपळे येथील विद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहुल जाधव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते आदी मान्यवर.

Web Title: We succeeded in life due to the rites performed at Pimple School: Rahul Jadhav