शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

'सत्ताधाऱ्यांसोबत बसून दंगली घडविण्याचा डाव आम्ही उधळला' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 11:57 AM

भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष

पुणे - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भीमा-कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर, तेथे जमलेल्या विविध संघटनांशी वार्तालाप केला. याठिकाणी आज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सभाही घेतली जाणार असून सर्वच अनुयायांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मात्र, विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

पोलिसांनी दक्षता घेतली आहे, काही जणांवर ते नजर ठेऊनही आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. मात्र, मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळी राजकीय परिस्थिती बदलल्याने लोकांनी राजकीय दंगल घडवली. सध्याही राज्यात सत्तांतर झाले असून त्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता. पण, आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून हा डाव उधळून लावल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.

भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना आणि मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून 1 जानेवारीला पुण्यात भीमसागर लोटला आहे. विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी सुमारे 10 हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शूरवीरांची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी इथं यावं. तसेच, कुणी काहीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. 

कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 सैनिकांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. 1927 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव 1 जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेAjit Pawarअजित पवार