'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:39 IST2025-03-12T13:37:31+5:302025-03-12T13:39:54+5:30
ड्रेनेज लाइनचे काम आज सुरू असताना या परिसरातील माजी नगरसेवकांने ठेकेदारांच्या कामगारांना मारहाण केली

'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण
पुणे : सहकारनगर येथील अरणेश्वर ते पद्मावती मंदिर यादरम्यान आंबील ओढ्यामध्ये १ हजार २०० मिलीमीटर व्यासाच्या ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या कामगारांना माजी नगरसेवकाने मारहाण केली. हे काम करण्यासाठी पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी पालिका प्रशासनाने सहकारनगर पोलिसांकडे केली आहे.
पुणे शहरात ड्रेनेज लाइनची कामे विविध ठिकाणी सुरू आहेत. त्यात अरण्येश्वर ते पद्मावती मंदिर यादरम्यान ड्रेनेजची १ हजार २०० मिलीमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यासाठी पालिकेने निविदा काढली होती. ही निविदा सुमारे पाच कोटींची आहे. या कामाची वर्क ऑर्डर देऊन एक महिना काम सुरू झाले नव्हते. अखेर या ड्रेनेज लाइनचे काम सुरू झाले. या ड्रेनेज लाइनचे काम आज सुरू असताना या परिसरातील माजी नगरसेवकांने ठेकेदारांच्या कामगारांना मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या कामगारांनी काम बंद ठेवले. त्यानंतर पालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन प्रकाराची माहिती घेतली. हे काम करण्यासाठी पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी पालिका प्रशासनाने सहकारनगर पोलिसांकडे केली आहे.
'अर्थ'पूर्तता न झाल्याने मारहाण
अरणेश्वर ते पद्मावती मंदिर यादरम्यान आंबील ओढ्यामध्ये १ हजार २०० मिलीमीटर व्यासाच्या ड्रेनेज लाइनचे काम सुरू करण्यापूर्वी ‘अर्थ’पूर्तता झालेली नाही. त्यामुळे माजी नगरसेवकांने या कामावरील ठेकेदारांच्या कामगारांना मारहाण केली, अशी चर्चा पालिका वर्तुळत आहे.