शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सारे दाभोलकर..

By admin | Updated: August 21, 2015 02:28 IST

आम्हाला धीर देणारा, शांतताप्रिय माणूस त्यांना डेंजर वाटला कसा? विचारांच्या निर्मळ झऱ्याला निर्सगवादी मृत्यू आला नाही, तर त्यांचा खून झाला आहे.

पुणे : आम्हाला धीर देणारा, शांतताप्रिय माणूस त्यांना डेंजर वाटला कसा? विचारांच्या निर्मळ झऱ्याला निर्सगवादी मृत्यू आला नाही, तर त्यांचा खून झाला आहे. ते आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासही बसत नाही. ते आपल्यामध्ये जिंवत आहेत... त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत, हे सांगतानाच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा कंठ दाटून आला अन् तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उपस्थितांचे डोळेही पाणावले. डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गुरुवारी ‘तिमिराकडून तेजाकडे’ या पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन करण्यात आले. अभिनेते किशोर कदम, गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी अभिवाचन केले. सोनाली कुलकर्णीने २०१३मध्ये प्रसिद्ध झालेला ‘घात झाला’ हा लेख वाचून दाखवला. या वेळी सोनाली म्हणाली, ‘‘दाभोलकरांनी कधीच किस्से सांगून रमवलं नाही. पोपटपंची करू नका, असा सल्ला ते कार्यकर्त्यांना देत.’’ दाभोलकरांसमवेत केलेल्या दौऱ्यांच्या आठवणी तिने सांगितल्या. नागराज मंजुळे म्हणाले, ‘‘जातपंचायत नष्ट होणे आवश्यक आहे. ज्या लोकांनी दाभोलकर आणि पानसरे यांचा खून केला आहे, त्यांची विचारधार स्पष्ट दिसत आहे. त्या लोकांचा पराभव आपण आपल्या विचारांनी करू शकतो.’’किशोर कदम म्हणाले, ‘‘दाभोलकर आणि पानसरेंना गोळ्या घालून अंधश्रद्धा निर्मूलनाची आणि समतेची चळवळ थांबली नाही. उलट, त्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून ती दुप्पट जोमाने पुढे चालली आहे. या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे यात तरुणाईचा सहभाग जास्त आहे. नागरी समाज जागृत होत आहे आणि आजच्या तरुणाईला आजूबाजूला काय चालू आहे, याची जाणीव आहे. तरुणाईच्या सहभागामुळे ही चळवळ अजून तीव्र होणार आहे.’’ दिर्ग्दशक अतुल पेठे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)