शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र

By किरण शिंदे | Updated: May 27, 2025 16:04 IST

लोकमतच्या प्रतिनिधीने देखील या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचं स्पष्ट झालं

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणात महिला आयोगाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला. याच पार्श्वभूमीवर महिलांना तातडीची मदत मिळावी यासाठी कार्यरत असलेले महिला आयोगाचे संपर्क क्रमांक सध्या बंद असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महिला आयोगाचे अधिकृत संपर्क क्रमांक – (022) 26592707 आणि हेल्पलाईन नंबर 155209 हे दोन क्रमांक आहेत. सध्या त्यापैकी संपर्क क्रमांक बंद असल्याचं स्पष्ट झालं आहे. "डझ नॉट एक्झिस्ट" असा मेसेज या नंबरवर कॉल केल्यावर ऐकायला मिळतो. "फोनवर महिला आयोगच Dose Not Exist" असा थेट अनुभव अनेकांनी घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधलं आहे. सामान्य महिलांना संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी कोणाकडे जायचं? सरकारी यंत्रणा अस्तित्वात असताना जर संपर्कच होत नसेल, तर त्या यंत्रणेचं अर्थ काय?" असा प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. लोकमतच्या प्रतिनिधीने देखील या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचं स्पष्ट झालं. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप महिला आयोगाने किंवा सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र मनसेकडून थेट मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवल्यामुळे आता याकडे गांभीर्याने पाहिलं जाईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणWomenमहिलाNCPराष्ट्रवादी काँग्रेस