Pune Rain: पाणी साचले, फांद्या तुटल्या, रस्ते घसरडे; पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय योजना करा, महापौरांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:58 IST2026-03-31T17:58:15+5:302026-03-31T17:58:30+5:30
नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 02025506800 व 02025501269 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे

Pune Rain: पाणी साचले, फांद्या तुटल्या, रस्ते घसरडे; पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय योजना करा, महापौरांचे आदेश
पुणे : शहर व परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या व परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करा, असे आदेश महापौर मंजुषा नागपूरे यांनी प्रशासनाला दिले.
अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक बागात रस्त्यांवर पाणी साचले, झाडांच्या फांद्या तुटल्या, रस्ते घसरडे झाले, रस्त्यांवर पांढरा फेस आला. या पार्श्वभूमीवर महापौरांनी शहरातील झाडांची छाटणी, धोकादायक फांद्या हटविणे, तसेच नाल्यांची व गटारांची साफसफाई ही कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या. पावसामुळे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच महानगरपालिकेच्या १ ते ५ परिमंडळातील उपायुक्तांना तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 02025506800 व 02025501269 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.