लॉकडाऊनमध्ये पुणेकरांचा पाणी वापर वाढला; घरगुती वापराचे प्रशासनाकडून कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:58 AM2020-06-24T11:58:52+5:302020-06-24T11:59:06+5:30

वारंवार अंघोळ करण्यापासून ते सतत कपडे धुण्यापर्यंतचा घरगुती वापर वाढला..

Water use of Punekars increased in lockdown; Reason for administration of domestic use | लॉकडाऊनमध्ये पुणेकरांचा पाणी वापर वाढला; घरगुती वापराचे प्रशासनाकडून कारण

लॉकडाऊनमध्ये पुणेकरांचा पाणी वापर वाढला; घरगुती वापराचे प्रशासनाकडून कारण

Next
ठळक मुद्देहॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, खासगी कंपन्या, दुकाने, खासगी कार्यालये आदी बंद

लक्ष्मण मोरे -

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सक्तीने घरी बसलेल्या पुणेकरांचापाणी वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा दीड टीएमसी पाणी पुणेकरांनी वापरल्याचे चित्र आहे. वारंवार अंघोळ करण्यापासून ते सतत कपडे धुण्यापर्यंतचा घरगुती वापर वाढल्याचे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या काळात व्यावसायिक आस्थापना बंद होत्या. हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, खासगी कंपन्या, दुकाने, खासगी कार्यालये आदी बंद ठेवण्यात आलेली होती. यासोबतच पुण्यातील कामगार, विद्यार्थी आणि परराज्यातून नोकरीनिमित्त आलेले चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावी गेले. त्यामुळे दरवर्षी पाटबंधारे विभागाकडे वाढीव पाणी कोटा मागताना लोकसंख्येत धरली जाणारी 'फ्लोटिंग पॉप्युलेशन' यंदा मात्र आपापल्या गावी गेलेली आहे. त्यामुळे आपसूकच पाणी वापर कमी होणे आवश्यक होते. पालिकेनेही त्या प्रमाणात पाणी कमी उचलणे अपेक्षित होते. परंतु, सरासरी प्रतिदिन १ हजार ३७९ एमएलडी पाणी उचलले जात आहे. महिन्याकाठी सरासरी ४२ हजार ११२ एलएमडी अर्थातच दीड टीएमसी पाणी पालिकेकडून उचलले जात आहे.
गेल्या वर्षी अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता अद्याप भासलेली नाही. शहरात सर्व बंद असताना आणि 'फ्लोटिंग पॉप्युलेशन' आपापल्या गावी परतलेली असतानाही एवढा पाणी वापर सुरूच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक पाण्याचा अधिक वापर करू लागले आहेत. पुणेकरांना दरवर्षी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणारी महापालिका मात्र यंदा कोरोनामुळे असा कोणताही प्रचार करताना दिसत नाही. कोरोनामुळे नागरिकांचा पाणी वापर वाढला असला तरी धरणात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असल्याने पाणी कमी पडण्याची चिंता पालिकेला नाही.
-------------
काय आहेत प्रमुख कारणे
१. वारंवार हात धुणे.
२. दिवसातून दोन ते तीन वेळा आंघोळ करणे.
३. बाहेरून आल्यानंतर कपडे तात्काळ धुवायला टाकणे.
४. भाज्या, दूध, पॅकिंग फूड्सची पाकिटे धुवून घेणे.
--------------
२०१९
महिना        दैनंदिन वापर (एमएलडी)   मासिक वापर       टीएमसी

फेब्रुवारी          १,१६४                                 ३२,५९२               १.२३
मार्च               १,२७४                                ३९,४९४                १.३९
एप्रिल            १,३६०                                 ४०,८१०                १.४४
मे                   १,२५९                               ३९,०१५                १.३८


२०२०
महिना             दैनंदिन वापर (एमएलडी)         मासिक वापर                टीएमसी

फेब्रुवारी                 १,३७४                                    ३९,८१५                      १.४१
मार्च                      १,४४७                                    ४४,१८३                       १.५८
एप्रिल                    १,४३८                                    ४३,१४०                      १.५२
मे                         १४५०                                      ४४,९३५                       १.५९
--------------

Web Title: Water use of Punekars increased in lockdown; Reason for administration of domestic use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.