Pune Water supply: पुणे स्टेशन, मंगळवार पेठेचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:47 IST2024-08-13T15:46:46+5:302024-08-13T15:47:44+5:30
शनिवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता

Pune Water supply: पुणे स्टेशन, मंगळवार पेठेचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद
पुणे : ससून हॉस्पिटल परिसरातील पाण्याची मुख्य वाहिनी फुटली आहे. ही गळती थांबविण्यासाठी येत्या शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रोजी या वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे स्टेशन, मंगळवार पेठेसह या सर्व भागाला शनिवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
पुणे स्टेशन परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलिस लाइन, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमाळा परिसर, जेधे पार्क, ससून हॉस्पिटल परिसर, गणेश खिंड रस्त्यावरील संचेती हॉस्पिटल ते मोदीबागपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रोडपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर, ताडीवाला रोड झोपडपट्टी व जुना बाजार परिसर.