पाइपलाइन फुटल्याने सातारा रोड चा पाणीपुरवठा विस्कळीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:19 AM2021-03-26T10:19:16+5:302021-03-26T10:21:17+5:30

संध्याकाळी ४ नंतर होणार पुरवठा

Water supply to Satara Road disrupted due to pipeline rupture. | पाइपलाइन फुटल्याने सातारा रोड चा पाणीपुरवठा विस्कळीत.

पाइपलाइन फुटल्याने सातारा रोड चा पाणीपुरवठा विस्कळीत.

Next

सातारा रोड आणि पर्वती परिसरातला पाणीपुरवठा आज विस्कळीत झाला आहे. सकाळचा ऐवजी या भागाला संध्याकाळी ४ नंतर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

या परिसराला पाणीपुरवठा करणारी हाय सर्व्हिस रिसरवायर पाईपलाईन रात्री फुटली त्यामुळे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी, शिवदर्शन , तावरे चौक, अरण्येश्वर, अशा अनेक भागांना पाणीपुरवठा झाला नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळाले.  शिवदर्शन, तावरे चौक, अरण्येश्वर, निर्मल बाग, शिंदे शाळे समोरील भाग सकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत व कमी दाबाने झाला.  या भागात सकाळी ५ ते ९ चा दरम्यान पाणीपुरवठा होतो. मात्र पाणी लवकर गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

या भागाचा पाणीपुरवठा संध्याकाळी चारनंतर सुरळीत होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. " आम्ही या पाइपलाईन ची दुरुस्ती तातडीने हाती घेतली आहे. लवकरात लवकर इथला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संध्याकाळी ४ नंतर या परिसरात पाणीपुरवठा करण्यात येईल" असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. 

Web Title: Water supply to Satara Road disrupted due to pipeline rupture.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.