Pune Water Supply News: गुरूवारी शहराच्या 'या' परिसरातील पाणी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:02 IST2021-12-06T19:00:40+5:302021-12-06T19:02:20+5:30

वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारितील रामटेकडी टाकीवरील विद्युत व पंपींग विषय तसेच बांधकाम विषयक तातडीची दुरूस्तीची कामे करायची असल्यामुळे पाणी बंद राहणार

Water supply closed in various area of the pune city on thursday | Pune Water Supply News: गुरूवारी शहराच्या 'या' परिसरातील पाणी बंद

Pune Water Supply News: गुरूवारी शहराच्या 'या' परिसरातील पाणी बंद

पुणे : वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारितील रामटेकडी टाकीवरील विद्युत व पंपींग विषय तसेच बांधकाम विषयक तातडीची दुरूस्तीची कामे करायची असल्यामुळे ,येत्या गुरूवार दि़ ९ डिसेंबर रोजी सिंहगड रोड, धनकवडी, कात्रज तसेच हडपसर परिसरातील पाणीपुरवठा पूर्ण दिव बंद राहणार आहे.   तसेच १० डिसेंबर रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने या भागात पाणीपुरवठा होणार आहे.  

पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याचबरोबर रामटेकडी टाकीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या हडपसर, काळेपडळ, महंमदवाडी, सय्यदनगर, गोंधळेनगर, बी़टीक़वडे रोड, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी आदी भागातील पाणीपुरवठा यादिवशी बंद राहणार आहे.      

Web Title: Water supply closed in various area of the pune city on thursday