शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा महापालिकेला विसर

By admin | Updated: October 24, 2015 04:45 IST

शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी

पुणे : शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी, वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याचा गैरवापर होत आहे. तसेच पाणीगळती, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे असे प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू असताना महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली कारवाई थंडावली आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के पाणीकपात करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील सर्व खासगी व सार्वजनिक जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर बंद करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पिण्याचा पाण्याचा गैरवापर झाल्यास, साठवण टाक्या भरून पाणी वाया गेल्यास, रस्त्यावर पाणी टाकल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे तसेच नळजोड तोडण्याचेही आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. इमारत निरीक्षक, पेठ निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पाण्याचा गैरवापर होत असल्यास ०२०-२५५०१३८३/२५५०१३८६ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार हेल्पलाइनवर पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड पालिकेने वसूल केला. मात्र, काही दिवसांपासून पालिकेची कारवाई थंडावली आहे. शहरातील अनेक वॉशिंग सेंटर बेकायदेशीरपणे सुरू आहेत. बांधकामांसाठीही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणीकपात लागू केल्यानंतर काही दिवस गांभीर्याने पाण्याच्या गैरवापराकडे लक्ष देण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर काही वॉशिंग सेंटर व नागरिकांवर कारवाईही करण्यात आली. मात्र, पाणीकपात लागू करून दोन महिने उलटल्यानंतर पाण्याच्या गैरवापराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा हा जुलै २०१६पर्यंत पुरवावा लागणार आहे. उन्हाळ्यामध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारीही पुण्याला उचलावी लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)महापालिकेकडूनच पाण्याची नासाडीहडपसर आकाशवाणी केंद्राजवळ महापालिकेची पाण्याची टाकी आहे. आठवड्यातून अनेक वेळा ही टाकी भरून हजारो लिटर पाणी वाया जाते. पाण्याचा थोडासाही गैरवापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जात असताना हजारो लिटर पाणी वाया घालविणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.शहरात ३० टक्के पाणीकपातयंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात केली आहे.२०४ जणांवर दंडात्मक कारवाई पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल.