शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर हॅमर’ने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार

By admin | Updated: January 7, 2015 00:42 IST

थंडीमुळे पालिकेच्या मोठ्या जलवाहिन्यांमध्ये ‘वॉटर हॅमर’ तयार होत असून, गेल्या महिनाभरात शहरात जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढले आहेत.

पुणे : थंडीमुळे पालिकेच्या मोठ्या जलवाहिन्यांमध्ये ‘वॉटर हॅमर’ तयार होत असून, गेल्या महिनाभरात शहरात जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत डिसेंबर २०१४ मध्ये ९०० हून अधिक तक्रारी पालिकेकडे आल्या असून, त्यातील तब्बल ५०० ठिकाणी ‘वॉटर हॅमर’मुळे जलवाहिन्या फुटल्या असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. थंडीमुळे पाण्याचे आकारमान वाढल्याने, मोठ्या जलवाहिन्यांमध्ये पाण्याचे जडत्व वाढते. त्यामुळे हवेचा दाब निर्माण होऊन हे ‘वॉटर हॅमर’ तयार होतात. शहरात महापालिकेच्या सुमारे ३६०० किलोमीटरच्या लहान मोठया जलवाहिन्या आहेत. त्यातील जवळपास १५०० किमी जलवाहिन्यांचे जाळे जवळपास वीस ते पंचवीस वर्षे जुने आहे. त्यातील मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फुटत आहेत. गेल्या महिनाभरात ‘वॉटर हॅमर’मुळे ठिकठिकाणी जलवाहिन्या दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)‘एअर वॉल्व्ह’ नसल्याने पर्याय नाही ४जलवाहिनीतील हवेचा दाब बाहेर काढण्यासाठी, जलवाहिनीच्या प्रत्येक ५०० मीटर अंतरावर ‘एअर व्हॉल्व्ह’ असणे आवश्यक आहे. गेल्या दशकभरापर्यंत हे ‘व्हॉल्व्ह’ प्रशासनाकडून बसविण्यात येत होते. मात्र, त्यानंतर शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर जलवाहिन्याचे जाळेही वाढले. मात्र, व्हॉल्व्ह बसविणे बंद झाले. तसेच, सततच्या रस्त्यांच्या कामांमुळे मोठ्या जलवाहिन्यांवर बसविण्यात आलेले अनेक ‘व्हॉल्व्ह’ जमिनीखाली गाडले आहेत. त्यामुळेही जलवाहिन्या फुटत आहेत.थंडीत पाण्याचे आकारमान वाढून वेगाने जाणाऱ्या पाण्याने हवेचा दाब तयार होतो. हा हवेचा दाब बाहेर काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने, हा दाब हातोड्याप्रमाणे काम करून जलवाहिनीच्या कमकुवत भागातून बाहेर पडतो. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडतात. हिवाळ्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. -व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख.