वॉचमनवर पिस्तुलातून गोळीबार;कारमधून आलेल्या आरोपींकडून दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 09:11 IST2024-12-28T09:11:07+5:302024-12-28T09:11:24+5:30

कारमधून पसार झालेल्या आरोपींनी दगड फेकून मारल्याने वॉचमनची पत्नी जखमी झाल्याची घटना घडली.

Watchman shot with pistol; accused in car throw stones | वॉचमनवर पिस्तुलातून गोळीबार;कारमधून आलेल्या आरोपींकडून दगडफेक

वॉचमनवर पिस्तुलातून गोळीबार;कारमधून आलेल्या आरोपींकडून दगडफेक

पुणे : उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याने रखवालदारावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात घडली. सुदैवाने या घटनेत वॉचमन जखमी झाला नाही. कारमधून पसार झालेल्या आरोपींनी दगड फेकून मारल्याने वॉचमनची पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. आरोपीने पिस्तूल बेकायदा बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी भानुदास शेलार, अजय मुंढे, सतीश ऊर्फ नाना मुंढे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. वॉचमन अक्षय साहेबराव चव्हाण यांनी याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत वॉचमन चव्हाण यांच्या पत्नी शीतल जखमी झाल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जय मल्हार हाॅटेलजवळ मोकळ्या जागेत अक्षय ो हे वॉचमन आहेत. अक्षय आणि त्यांच्या पत्नी शीतल तेथे राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास कारमधून आरोपी आले. ते मोकळ्या जागेत लघुशंका करत होते. वॉचमन चव्हाण यांनी त्यांना हटकले. त्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. चव्हाण यांना मारहाण करून त्यांना दगड फेकून मारला. चव्हाण यांच्या पत्नी शीतल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फेकून मारलेला दगड त्यांना लागल्याने त्यांचे डोके आणि पायाला दुखापत झाली. आरोपींनी चव्हाण यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. दैव बलवत्तर होते म्हणून ते बचावले. चव्हाण यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक करणकोट यांनी दिली.

Web Title: Watchman shot with pistol; accused in car throw stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.