'नव्या लालपरी'तून आठ वर्षांनंतर होणार वारकऱ्यांचे श्री विठ्ठल दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:27 IST2025-05-31T09:26:57+5:302025-05-31T09:27:33+5:30
विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना 'नव्या लालपरी 'तून प्रवास असून, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

'नव्या लालपरी'तून आठ वर्षांनंतर होणार वारकऱ्यांचे श्री विठ्ठल दर्शन
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) आषाढी वारी आणि दिवाळी पूर्वी नवीन बस दाखल होत होते. परंतु, २०१६ नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झाली नव्हती. यंदा मात्र राज्यातील सर्व आगारांत एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत. त्यामुळे यंदा वारीच्या काळात नव्या लालपरी धावणार आहेत, त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना 'नव्या लालपरी 'तून प्रवास असून, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
आषाढी वारीसाठी राज्य आणि राज्याबाहेरील लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. या काळात एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्व आगारांतून जादा बस सोडण्यात येते. विशेषतः पुणे विभागातून पंढरपूरसाठी मागील वर्षी ३८० बस सोडण्यात आले होते. बसच्या सोयीमुळे वारीसाठी लाखो भाविक पुण्यातून विठ्ठल दर्शनाला जातात. गेल्या आठ वर्षापासून पुणे विभागात नवीन लालपरी दाखल झाले नाही. भाविकांना जुन्या बसमधूनच प्रवास करावा लागत होता. परंतु, यंदा पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल झाले असून पुढील महिन्यात तेवढ्याच बस दाखल होतील.
पुण्यातून दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्त असते. त्याचे नियोजन होत आहे. यंदा पुणे विभागातून पंढरपूरला नव्या बस सोडण्यात येणार असल्याने भाविकांचा आरामदायी प्रवास होईल. - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे.