मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:55 IST2026-03-03T15:54:31+5:302026-03-03T15:55:36+5:30

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

War-like situation in Middle Eastern countries; Pune District Magistrate issues communication with Indian embassies in relevant countries | मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

पुणे: मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क 
 
पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८,
ई-मेल : repoffice@mea.gov.in
cons.ramallah@mea.gov.in 

कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२,
ई-मेल : cons.doha@mea.gov.in 

सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७,
व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८,
टोल फ्री : ८००-२४७-१२३४,
ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in  

इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८,
ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in 

इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, 

संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२,
व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१,
ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in  /ca.abudhabi@mea.gov.in 

कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६,
ई-मेल : community.kuwait@mea.gov.in

बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१,

मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४,
व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०,
ई-मेल : cw.muscat@mea.gov.in/   cons.muscat@mea.gov.in 

जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६
आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९,
वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ 
तसेच ई-मेल  : cons.baghdad@mea.gov.in/   cons1.baghdad@mea.gov.in/  pol.baghdad@mea.gov.in
नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत. 

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास  जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२३३७१/२६१२३३५२२/२६१३३५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

Web Title : मध्य पूर्व अशांति: पुणे कलेक्टर ने भारतीय दूतावास संपर्क जारी किए।

Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच, पुणे के अधिकारियों ने प्रभावित देशों में नागरिकों के लिए भारतीय दूतावास संपर्क विवरण जारी किए। जिलाधिकारी ने सतर्कता बरतने और सहायता के लिए दूतावासों या आपदा प्रबंधन से संपर्क करने का आग्रह किया।

Web Title : Middle East unrest: Pune Collector releases Indian embassy contacts.

Web Summary : Amid Middle East tensions, Pune authorities released Indian embassy contact details for citizens in affected countries. District Collector urges vigilance and contact with embassies or disaster management for assistance.