शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

पुण्यातील धक्कादायक घटना, लग्नाचा सल्ला दिला म्हणून वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 01:14 IST

खराडी येथील घटना : मित्राच्या आईवरच कुऱ्हाडीने हल्ला

पुणे : लग्न करण्याचा सल्ला दिल्याने एका तरुणाने मित्राच्या आईवर कुºहाडीने वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खराडी येथील यशवंतनगरमध्ये सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास येथे घडली. या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अतुल सावळाशंकर रासकर (वय ३०, रा. खराडी) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत रमा सदाशिव धावनपल्ली (वय ४८) या जखमी झाल्या आहेत. त्यांचे पती सदाशिव धावनपल्ली (वय ५४, रा. खराडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा राकेश व आरोपी अतुल रासकर हे दोघेही मित्र आहेत. फिर्यादीचा मुलगा राकेशचा विवाह ठरल्याने फिर्यादी व त्यांची पत्नी रमा हे दोघेही आरोपी अतुलच्या घरी लग्नपत्रिका देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी आरोपीला विवाह का करत नाहीस? लवकर विवाह कर, असे समजावून सांगितले होते. याचा राग मनात धरून आरोपी अतुल हा सोमवारी फिर्यादी यांच्या घरी आला होता. तेव्हा फिर्यादीची पत्नी रमा या एकट्याच घरी होत्या. आरोपीने त्यांना पाणी मागितल्या, त्या पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेल्या. तेव्हा आरोपीही त्यांच्या पाठोपाठ किचनमध्ये गेला. त्याने अचानक रमा यांच्या डोक्यावर कुºहाडीने हल्ला केली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडा ओरडा केल्यावर आरोपी पळून गेला. रासकरने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले असून तो एमबीए करीत आहे. सध्या तो बेरोजगार असून त्याचे वय ३० वर्षे आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने रमा यांनी त्याला विवाह करण्याचा सल्ला दिला होता.पोलिसाशी हुज्जत घालणारा अटकेतपुणे : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यास सांगितल्याने पोलीस कर्मचाऱ्यास दमदाटी करणाºया हॉटेल चालकास कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. जाहिद शाफी कुरेशी (वय ३०, रा. कोंढवा खुर्द) असे अटक आरोपीचे नाव आहे. फिर्यादी ए. ए. शेख हे कोंढवा पोलीस स्टेशमध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी रात्री गस्त घालत असताना त्यांनी आरोपीला त्याचे हॉटेल हे नियमापेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्याने ते बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. के. चाऊस तपास करीत आहेत.

पोलिसाला धमकावले

पुणे : पोलीस कर्मचाºयास धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी पहाटे ताडीवाला रस्ता येथे घडली. फिर्यादी यू. बी. रजपुत (वय ४०) हे बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. ते गस्तीवर असताना त्यांना आरोपी टिप्या ऊर्फ सुलतान लतिफ शेख (वय २५, रा. ताडिवाला रस्ता) हा त्याच्या दोन साथीदारांसह रस्त्यावर उभा असलेला दिसला. त्याला फिर्यादीने तेथून जाण्यास सांगितले. मात्र, त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादी त्यांना ‘चौकीला चला’ असे म्हटल्यावर त्यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जयवंत पाटील करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे