- किरण शिंदे पुणे - बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मागील अनेक दिवसांपासून वाल्मीक कराड शरण येणार अशा चर्चा सुरू होत्या. त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आज अखेर तो हजर झालाय. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी कारवाई केली आहे.सीआयडीने यातील आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्यात बैठक झाली असून यात कराडच्या शरण येण्यावर निर्णय झाल्याचे समजते आहे.दरम्यान, वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी काय काय घडलं पाहूयात.. वाल्मीक कराड पुण्यात सरेंडर करणार अशी मागील दोन दिवसांपासून चर्चा होते. त्यानंतर आज सकाळी सात वाजल्यापासून वाल्मीक कराडचे कार्यकर्ते पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयाबाहेर एकत्र जमण्यास सुरुवात झाली.सकाळी ९ वाजता
काही वेळात माध्यमांची ही गर्दी त्या ठिकाणी जमा झाली. सकाळी नऊ नंतर सीआयडी ऑफिस बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला.
सकाळी १० वाजता
पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी देखील सीआयडी कार्यालयाबाहेरील सुरक्षेचा आढावा घेतला. सकाळी ११ वाजता
वाल्मीक कराड बाराच्या दरम्यान सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर आली.दुपारी १२ वाजता
पुणे सी आय डी कडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मीक कराड याने व्हिडिओ केला शेयर
दुपारी १२. १५ वाजता
MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सी आय डी ऑफिस मध्ये दाखल
दुपारी १ वाजता
सी आय डी चे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मीक कराड ची चौकशी सुरु.