भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम; आव्हाडांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 15:33 IST2025-03-15T15:32:30+5:302025-03-15T15:33:57+5:30

ते अनधिकृत रिसॉर्ट कोणते ? आणि खरंच वाल्मिकी कराड राहिला होता का ? या प्रश्नाच्या चर्चेला जाऊ लागला आहे.

walmik karad stayed at an unauthorized resort near Bhama Askhed Dam Jitendra Awhad claims | भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम; आव्हाडांनी केला दावा

भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम; आव्हाडांनी केला दावा

चाकण : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे.परंतु कराड हा पोलिसांत हजर होण्यापूर्वी खेड तालुक्यातील एका अनधिकृत रिसॉर्टवर चार दिवस मुक्कामाला राहिला होता. असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे केल्याने ते अनधिकृत रिसॉर्ट कोणते ? आणि खरंच वाल्मिकी कराड राहिला होता का ?  या प्रश्नाच्या चर्चेला जाऊ लागला आहे.

भामा- आसखेड धरणाजवळील पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील हे अनधिकृत रिसॉर्ट अनेक कारणामुळे चर्चेत आहे.मागील काही वर्षांपूर्वी याच रिसॉर्ट रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला होता. यामध्ये अनेक मातब्बर लोक पोलिसांच्या हाती लागले होते.त्यावेळी या रिसॉर्ट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु हे रिसॉर्ट पुन्हा नव्याने बांधणी करून उभे राहिले आहे. याच अनधिकृत रिसॉर्टवर मागील तीन महिन्यांपूर्वी खेड महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगी रंगीत संगीत पार्टी केली होती.त्याचे व्हिडीओ प्रसार माध्यमांवर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे प्रासर माध्यमांशी बोलताना सांगितले की, खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणालगतच्या एका अनधिकृत रिसॉर्टवर वाल्मिक कराड चार दिवस मुक्कामी राहिला होता.तो चांगला मटण - बिटन खात होता. तेथील जलतरण तलावात मस्त पैकी पोहत होता.रिसॉर्टचा मालक ही त्याच्या सेवेला हजर होता.असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा ते रिसॉर्ट आणि आकाचा खेड तालुक्यातील बोका कोण आहे ? अशी चर्चा रंगू लागली आहे.

भामा आसखेड धरण क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि भराव टाकल्याने याचा धरणावर अतिरिक्त दाब निर्माण होऊन संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.याशिवाय अनधिकृत बांधकामांमधून बाहेर पडणारे सांडपाणी थेट धरणाच्या जलाशयात मिसळले जात आहे, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होत आहे.धरणाच्या सुरक्षित क्षेत्रात अनधिकृत हेलिपॅड, बोटिंग सेवा, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रम चालवले जात आहेत.  या सर्वांसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही.याची माहिती मिळावी अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी संबंधित विभागांच्या सचिवांकडे मागितली आहे.

सांडपाणी धरणात -

भामा आसखेड धरणातील पाणी पिण्यासाठी पुणे - पिंपरी चिंचवडसह खेड तालुक्यातील बहुतांश गावांना जात आहे.मात्र धरणालगतच्या फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे सांडपाणी धरणात सोडले जात असल्याने पाणी प्रदूषण होत आहे.या अनधिकृत रिसॉर्ट उभे करतना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही.अश्या अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याची गरज असताना.अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे.  - अभिमन्यू शेलार,सामाजिक कार्यकर्ते  

Web Title: walmik karad stayed at an unauthorized resort near Bhama Askhed Dam Jitendra Awhad claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.