१० मोटारसायकल लंपास करणाऱ्या चोरट्याला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 19:52 IST2021-02-19T19:50:56+5:302021-02-19T19:52:20+5:30
वालचंदनगर बाजारपेठ, भवानीनगर, जंक्शन, कळस येथे रात्र गस्त वाढव चोरट्याचा शोध सुरु केला होता...

१० मोटारसायकल लंपास करणाऱ्या चोरट्याला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कळस : मोटारसायकल चोरांचा छडा लावण्यात यश आले आहे. १० मोटारसायकलसह चोराला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. कृष्णा शिवाजी कांबळे (रा. खानोटा ता.दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मार्गदर्शक सूचना देवुन छडा लावण्याचे आदेश दिले होते. यानुसार गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अतुल खंदारे यांचे विशेष पथक नेमुन तपास करण्याचे सांगितले. त्यानसुार वालचंदनगर बाजारपेठ, भवानीनगर, जंक्शन, कळस येथे रात्र गस्त वाढव चोरट्याचा शोध सरु केला होता. याबाबतच पोलीस स्टेशनला नेचर डिलाईट डेअरी येथुन मोटारसायकल चोरी झालेबाबत गुन्हा दाखल झाला.
यामुळे पोलीस अंमलदार प्रकाश माने व प्रकाश बनसोडे यांनी गोपनीय बातमीच्या आधारे कृष्णा कांबळे याला ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने भिगवण येथे ३, बारामतीत २ व दौडमध्ये १, वालचंदनगर येथे १ व आणखी ३ मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले आहे अधिक तपास करण्याचे काम सुरु आहे.