शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत हिंसक वळण

By admin | Updated: August 15, 2014 01:02 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरूवारी झालेल्या ‘चक्का जाम’ आंदोलनाला बारामतीत हिंसक वळण लागले.

बारामती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरूवारी झालेल्या ‘चक्का जाम’ आंदोलनाला बारामतीत हिंसक वळण लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग बंगल्यासमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी बाजारपेठा बंद करण्यासाठी जबरदस्ती केली. शहरातील दुकानांच्या काचा फोडल्या. एसटी बसगाड्यांवर दगडफेक केली. बारामतीच्या माजी नगराध्यक्षांची मोटारही फोडली. येथील जुन्या मंडईत दुकाने जबरदस्तीने बंद करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यावर आंदोलक तरुणांनी बेभान होऊन दारू विक्रीचे दुकान तोडले. आंदोलन चिघळत असल्याचे चित्र दिसल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे हाताबाहेर जात असलेली परिस्थिती आटोक्यात आली. धनगर आरक्षण कृती समितीच्या नेत्यांनी आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली होती. आंदोलनाला राष्ट्रीय समाजपक्षाने पाठिंबा दिला होता. या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटीच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांबरोबरच मेंढ्या देखील रस्त्यावर आणल्या होत्या. जवळपास २ तास रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी आमदार विजयराव मोरे, दशरथ राऊत, किशोर मासाळ यांच्यासह कृती समितीचे नेते अ‍ॅड. जी. बी. गावडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी े आंदोलनाचे नेतृत्व केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोरच आंदोलन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित आंदोलक बारामती शहरात दाखल झाले. त्यांनी थेट दुकाने बंद करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे व्यापाऱ्यांसह आज बाजार दिवशी खरेदीला आलेल्या ग्राहकांची देखील धावपळ उडाली. तरी देखील झटपट दुकाने बंद झाली. मात्र, येथील मोता कापड दुकानांसह अन्य दुकानांच्या काचांवर दगडफेक झाल्याने पोलिसांचे देखील धावपळ उडाली. उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम अन्य अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांवर लाठीचार्ज करुन त्यांना पांगवल्यानंतर तणाव काहीसा निवळला. (प्रतिनिधी)