शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

Vidhan Sabha 2019 : भाजप-शिवसेनेच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांवर काँग्रेस आघाडीचा गळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 1:28 PM

‘राष्ट्र्वादी’चे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार’ असे सूचक वक्तव्य करून ‘आयारामां’चे स्वागत करण्याची तयारी दाखवली आहे...

ठळक मुद्देतिकिटाची खात्री नसलेल्या मंडळींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पर्याय चाचपण्यास सुरुवात

पुणे : भारतीय जनता पक्षाने पुण्यातील उमेदवारांची नावे निश्चित करून आघाडी घेतली असली तरी त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील अनेक इच्छुक आणि त्यांचे समर्थक दुखावले गेले आहेत. या दुखावलेल्या नेते-कार्यकर्त्यांना बंडाची हवा देऊन आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘राष्ट्र्वादी’चे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार’ असे सूचक वक्तव्य करून ‘आयारामां’चे स्वागत करण्याची तयारी दाखवली आहे. भाजप-शिवसेनेकडून तिकिटाची खात्री नसलेल्या मंडळींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पर्याय चाचपण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. मात्र, जागावाटपाचे चित्र स्पष्ट नाही. भाजपने शिवसेनेकरिता पुण्याकरिता किमान दोन तरी जागा सोडाव्यात अशी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भावना आहे. अन्यथा पुण्यातील शिवसेनेचे अस्तित्वच संपून जाईल, अशी चिंता शिवसैनिकांना आहे. सन २०१४ च्या विधानसभेत पुण्यातल्या आठही जागा गमावल्यापासून त्यानंतरच्या शिवसेनेची पीछेहाट झाली आहे. पुण्यातल्या सर्व मतदारसंघांवर भाजपचाच वरचष्मा राहील, अशी चिंता शिवसैनिकांना आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक निम्हण, हडपसरमधून महादेव बाबर, कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे इच्छुक आहेत. मात्र महायुतीची घोषणा होत असतानाच पु्ण्यातल्या आठही मतदारसंघांत भाजप उमेदवारांना कामाला लागण्याचा इशारा देण्यात आल्याने शिवसेनेच्या इच्छुकांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता मावळत चालली आहे. त्यामुळे या नेत्यांपुढे, काय भूमिका घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. यातच कॉंग्रेस आघाडीकडून मंडळींना विचारणा होतेय.काही मतदारसंघांत कॉंग्रेस आणि राष्टÑवादीकडे तगडे उमेदवार नाहीत. त्यामुळे शिवसेनेकडून तसेच भाजपतून येणाºया नेत्यांचे आघाडीमध्ये स्वागत होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, मधल्या काळातले कॉंग्रेसवासी आणि अलीकडच्या काही काळापासून पुन्हा शिवसैनिक झालेल्या निम्हण यांनी कॉंग्रेस आघाडीकडून लढण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनीही सर्वपक्षीय उमेदवार म्हणून कोथरूडमध्ये चंद्रकात पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. मात्र अद्याप तरी मोकाटे यांनी त्याला मान्यता दिलेली नाही. मनसे कॉंग्रेस आघाडीत नसेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच जाहीर केल्याने मनसेने निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांना मनसेचे दरवाजेही उघडे आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेतून आलेल्या एका नाराज नगरसेवकाला राज ठाकरे यांनी उमेदवारीही जाहीर केली आहे. हाच फॉर्म्युला मनसे पुण्यातही अंमलात आणू शकते. ......

आता युतीचा निर्णय झाला आहे. थोड्याच दिवसांत पुण्यातील जागेचा प्रश्न सुटेल. प्रत्यक्षात अजून विश्वासार्ह माहिती पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यापर्यंत नाही. पुढील दिवसांत चित्र स्पष्ट होईलच. उद्धव  ठाकरे यांचा आदेश शिवसैनिकांना बांधील असणार आहे.- पृथ्वीराज सुतार, शिवसेना, गटनेते पुणे महानगरपालिका...........आता कुठे युतीची घोषणा झाली. इतक्यात जागावाटपांविषयी बोलणे उचित ठरणार नाही. पुण्यात कुठल्या विधानसभा मतदारसंघाला जागा द्यायच्या, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत.  दोन्ही पक्षांकडून जागेविषयी विचार घेतला जाईल. त्यानंतर योग्य तो  निर्णय घेतला जाणार आहे. - डॉ. नीलम गोºहे, विधान परिषदेच्या उपसभापती.......अद्याप पुण्यातील कुठल्याही जागेवर निर्णय झालेला नाही. यापूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुण्यातील जागा लढविण्यासंबंधी चर्चा केली आहे. त्यातून किमान दोन जागा तरी देण्यात याव्यात अशी मागणी आहे. ते ठरवतील त्यानुसार आम्ही पक्षाचे काम करणार आहोत. त्यांचा आदेश अंतिम असेल. - संजय मोरे, शहर प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा