बाथरुममध्ये मोबाइल लपवून शिक्षिकेचा काढला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:05 IST2022-04-02T11:03:04+5:302022-04-02T11:05:28+5:30

पुण्यातील प्रकार : बाथरूममध्ये शिक्षिकेलाच दिसला कॅमेरा

Video of the teacher hiding her mobile phone in the bathroom | बाथरुममध्ये मोबाइल लपवून शिक्षिकेचा काढला व्हिडीओ

बाथरुममध्ये मोबाइल लपवून शिक्षिकेचा काढला व्हिडीओ

पुणे : घरी इंग्रजीची शिकवणी घेण्यासाठी येणाऱ्या प्रौढ  शिक्षिकेचा १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बाथरूममध्ये मोबाईल लपवून ठेवून व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलंकार पोलिसांनी कर्वेनगरमधील एका १६ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ५६ वर्षांच्या शिक्षिकेने फिर्याद दिली. हा प्रकार कर्वे नगरमधील या मुलाच्या घरी ३ ते ३० मार्चदरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका गेली ५ वर्षे इंग्रजी विषयाची शिकवणी घेण्यासाठी त्याच्या घरी जात आहे. काही दिवसांपूर्वी त्या मुलाच्या घरातील वॉशरूममध्ये त्या गेल्या होत्या. 

त्या जाण्याआधी या मुलाने वॉशरूममध्ये मोबाईल ठेवून त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून ठेवले होते. या शिक्षिका नैसर्गिक विधी करीत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यापूर्वी त्या शिकवणी घेत असताना फिर्यादी यांच्या छातीचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला होता. बुधवारी त्या शिकवणी घेण्यासाठी गेल्या त्यावेळी आत साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकताना त्यांना दिसले. त्यांनी ते खोके बाजूला केले, तर तेथे मोबाइल सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या मोबाईलचा डेटा तपासला, तेव्हा त्यात त्यांना यापूर्वी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला दिसून आला. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

Web Title: Video of the teacher hiding her mobile phone in the bathroom