Video : अंगावर हुडी, डोळ्यांवर गॉगल; श्रीवल्लीवर वसंत मोरेंचा भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 16:03 IST2023-04-19T15:57:40+5:302023-04-19T16:03:03+5:30

मनसेचे नेते वसंत मोरे अनेकदा चर्चेत असतात. यावेळी त्यांच्या भन्नाट डान्स स्टेप्समुळे ते चर्चेत आलेत.

Video Hoodie goggles on eyes pune mns leader Vasant More fantastic dance on Srivalli allu arjun viral on social media | Video : अंगावर हुडी, डोळ्यांवर गॉगल; श्रीवल्लीवर वसंत मोरेंचा भन्नाट डान्स

Video : अंगावर हुडी, डोळ्यांवर गॉगल; श्रीवल्लीवर वसंत मोरेंचा भन्नाट डान्स

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे अनेकदा चर्चेत असतात. कधी चहाच्या टपरीवर चहा करण्यापासून तर कधी कोणाच्या मदतीला जाण्यापर्यंत अनेकदा वसंत मोरेंच्या नावाची चर्चा होते. आता सध्या पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा होतेय ती त्यांच्या डान्समुळे. 

वसंत मोरे यांनी श्रीवल्ली या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अंगावर हुडी, गॉगल अशा निराळ्या स्वॅगमध्ये वसंत मोरे श्रीवल्ली या गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसतायत. १४ सेकेंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

वसंत मोरे हे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. तसंच ते कट्टर मनसैनिक असून पुण्यात ते लोकप्रियही आहेत. मोरे हे शेतकरी आहेत, तसंच ते एक व्यवसायिकही आहेत. २७ वर्षांपासून ते राज ठाकरेंचे सहकारी म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला.

Web Title: Video Hoodie goggles on eyes pune mns leader Vasant More fantastic dance on Srivalli allu arjun viral on social media