शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Video: अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णाची 'कलाकारी' ; बासरीच्या सूरांनी वातावरण केले एकदम 'टेन्शन फ्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 11:41 IST

अतिदक्षता विभाग म्हटलं की, फक्त मॉनिटर्सचे आवाज , प्राणवायू मिळवण्यासाठी रुग्णांची चाललेली धडपड, डॉक्टरांची रुग्णांना वाचवण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा हेच चित्र डोळ्यापुढे येते...

पांडुरंग मरगजे -

पुणे : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे हल्ली रस्त्यावरच्या भयाण शांततेत फक्त रुग्णवाहिकेच्या सायरन चा आवाज कानावर पडतोय. तसेच रुग्णालयातील अवस्था पाहून काळजात एकदम धस्सं होतं. त्यात अतिदक्षता विभाग म्हटलं विचारायलाच नको. पण जर कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या अतिदक्षता विभागात  बासरीचे मंजूळ स्वर कानावर पडले तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.पण पुण्यातील एका कोरोना बाधिताने अतिदक्षता विभागात बासरीच्या अनवट स्वरातून 'जीवन गाणे गातच राहावे' या गाण्याचे सूर असे काही छेडले की टेन्शनचं वातावरणात एकदमच आनंद, चैतन्याने भारावून गेले.

अतिदक्षता विभागात बासरीचे स्वर छेडणाऱ्या कलाकाराचे नाव आहे पोपट कुंभार.. त्यांच्यावर एकीकडे कोरोनाचे उपचार सुरू होते. परंतु त्यांनी याही परिस्थितीमध्ये बासरीवर सूर छेडले आणि 'जीवन गाणे गातच रहावे' हा संदेश कोरोनाग्रस्त रुग्णांना दिला. हल्ली 'कोरोना' आणि 'मृत्यूचं भय' हे दोन शब्द 'समानार्थी' झाले आहेत. परंतु कोरोनाचे भय बाळगण्यापेक्षा हिंमतीने त्याचा सामना केला आणि त्यासाठी कुटुंब, मित्र व डाॅक्टरांची वेळीच साथ लाभली तर अतिदक्षता विभागात दाखल केलेली कोरोनाग्रस्त ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा कोरोनावर मात करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोपट नामदेव कुंभार आहे.

यासंदर्भात 'लोकमत' शी बोलताना महेंद्र कोंढरे म्हणाले, मारुती कुंभार यांचे वडील पोपट कुंभार यांची कोविड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यातच त्यांना न्यूमोनिया असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न होता प्रकृती अजूनही खालावत गेली. इन्फेक्शन खूप वाढले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेले मारुती नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे यांना घाबरलेल्या अवस्थेत सांगितले, की "काही पण करा... पण माझ्या वडिलांचे प्राण वाचवा." कोंढरे यांनी मारुती याला धीर दिला, व धायरी येथील खासगी रुग्णालयात (सिल्व्हर बर्च हॉस्पिटलचे संचालक डॉ. वैभव पाटील) संपर्क साधून बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. बेड उपलब्ध होताच मारुती कुंभार यांच्या वडिलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.  

दरम्यान अतिदक्षता विभाग म्हटल की फक्त मॉनिटर्सचे आवाज , प्राणवायू मिळवण्यासाठी रुग्णांची चाललेली धडपड, डॉक्टरांची रुग्णांना वाचवण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा हेच चित्र डोळ्यापुढे येते. पण या रुग्णालयात (सिल्व्हर बर्च हॉस्पिटल) अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या आणि कोविड पाॅझिटिव्ह निदान झालेल्या पोपट कुंभार यांनी उपचारातून फुरसत मिळताच बासुरीवर अनवट सूर छेडले आणि रुग्णालयातील वातावरण उत्साही झाले, तणाव कमी झाला आणि इतर रुग्णांच्या मनातील भीती नाहीशी झाली. कुंभार यांच्या बासुरीच्या सुराने जणू हेच सांगितले की, योग्य उपचार मिळाली तर अतिदक्षता विभाग सुध्दा सूरमयी होऊन जाते. यासाठी महत्वाचे असते  ते म्हणजे 'योग्य वेळी योग्य उपचार मिळणे'. या रुग्णालयात कुंभार यांना तत्पर आणि सुयोग्य उपचार मिळाले. आणि त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. 

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतartकलाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल