Video: जुनी मैत्रीण, ब्रेकअपचा राग; पुण्यात मित्रानेच मित्रावर केलेल्या कोयता हल्ल्याचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:40 IST2026-02-05T19:39:04+5:302026-02-05T19:40:42+5:30

पुण्यात घडलेल्या एका घटनेच्या व्हिडीओने खळबळ उडवून दिली. एका तरुणाने जिवलग मित्रावरच कोयत्याने सपासप वार केले. सुरुवातीला माहिती समोर आली की, जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून हे घडलं. पण, खरं कारण वेगळंच आहे. 

Video: Anger over breakup with ex-girlfriend; What was the reason for the scythe attack by a friend on a friend in Pune? | Video: जुनी मैत्रीण, ब्रेकअपचा राग; पुण्यात मित्रानेच मित्रावर केलेल्या कोयता हल्ल्याचे कारण काय?

Video: जुनी मैत्रीण, ब्रेकअपचा राग; पुण्यात मित्रानेच मित्रावर केलेल्या कोयता हल्ल्याचे कारण काय?

पुण्यातील त्रिमूर्ती चौकात दोन जिवलग मित्रांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रकरण इतकं वाढलं की, एका मित्राने दुसऱ्या मित्रावर थेट कोयत्यानेच वार केले. दोघांची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून हे घडल्याचे सुरूवातील सांगण्यात आलं. पण, तपासातून हल्ल्याची वेगळी माहिती समोर आली. 

एक घटना जी पुण्यातील धनकवडीतील त्रिमूर्ती चौकात घडली. ही घटना घडली २ फेब्रवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास. २१ वर्षीय आदित्य कांबळे आणि २३ वर्षीय सुनील चव्हाण या दोन जवळच्या मित्रांमध्येच हा प्रकार घडला. 

सुनील चव्हाणने आदित्य कांबळेवर कोयत्याने हल्ला का केला?

२ फेब्रुवारी रोजी रात्री सुनील आणि आदित्य भेटले. त्रिमूर्ती चौकात गप्पा मारत असताना त्यांच्यात जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्यात आदित्यने लगेच तिला कॉल केला. त्यामुळे त्यातून सुनील चव्हाणला शंका आली की, आपले त्या मुलीसोबत ब्रेकअप आदित्यनेच केले आहे. 

त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेला. संतापलेल्या सुनीलने तिथेच असलेल्या रसवंतीवरून कोयता उचलला आणि आदित्य मागे धावत सुटला. आदित्य अडकला आणि सुनीलने सपासप वार करायला सुरूवात केली. 

आदित्यची प्रकृती गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

सुनीलकडूने करण्यात आलेले कोयत्याचे वार आदित्यने चुकवण्याचे आणि हाताने रोखण्याचे प्रयत्न केले. पण, संतापलेला सुनील वार करतच राहिला. त्यात तो गंभीर जखमी झाला. 

आदित्य कांबळे यांच्या हाताला, डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला ३० टाके पडले आहेत. त्याच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी सुनील चव्हाण विरोधात विविध कलमान्वये गु्न्हा दाखल केला आहे.

Web Title : पुणे: दोस्ती दुश्मनी में बदली; ब्रेकअप पर दोस्त ने हंसिये से हमला किया

Web Summary : पुणे में, एक उभयनिष्ठ महिला मित्र को लेकर विवाद के चलते दो दोस्तों के बीच तीखी बहस हुई। एक दोस्त ने दूसरे पर हंसिये से हमला कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। पीड़ित अस्पताल में है, और पुलिस ने हमलावर के खिलाफ आरोप दर्ज कर लिया है।

Web Title : Pune: Friendship turns Foe; Angered Friend Attacks with Sickle over Breakup

Web Summary : In Pune, a dispute over a mutual female friend led to a heated argument between two friends. One friend attacked the other with a sickle, causing serious injuries. The victim is hospitalized, and police have filed charges against the attacker.