शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी घेतला अनेक प्रजातींचा बळी

By admin | Updated: July 4, 2015 00:08 IST

नदीसुधार योजनेसाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला तब्बल ९०० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत पुणेकरांनी केलेल्या प्रदूषणामुळे अनेक दुर्मिळ मासे,

सुनील राऊत, पुणेनदीसुधार योजनेसाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला तब्बल ९०० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत पुणेकरांनी केलेल्या प्रदूषणामुळे अनेक दुर्मिळ मासे, वनस्पतींच्या प्रजातीच नष्ट झाल्या आहेत. शहराच्या लोकसंख्येने २५ लाखांचा आकडा गाठला आहे. त्यामुळे शहराची पाण्याची मागणी साडेचार टीएमसीवरून थेट १६ टीएमसीवर पोहोचली. परिणामी शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे आजवर्षाला निर्माण होणारे तब्बलआठ टीएमसी पाणी थेट नदीत सोडले जात असून त्यातील केवळ दोन ते अडीच टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करणे महापालिकेस शक्य झाले आहे.नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या या सांडपाणी तसेच राडारोडा आणि कचऱ्याने मुठा नदीच्या पोटातील जैवसृष्टीचा बळी घेतला आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मुठा नदीपात्रात पत्थर चाटू मासा तसेच मुंगूस लोचमासा यांचे अस्तित्व संपले आहे. याशिवाय वाघ्या बेडकासह असंख्या प्रजातीही नामशेष झालेल्या आहेत. या माशांबरोबरच ‘इक्वीसिटम’, हार्सटेल, क्रिप्टो कोरीनी, व्हँली स्कारीया या वनस्पती नष्ट झालेल्या आहेत. अनेक पक्षांचे तसेच कीटकांचे अधिवास असलेले पाणकणीस, रानटी केवडा, माती पकडून ठेवणारे आणि नदीचे पाणी शुध्द करणारे वाळूंज या वनस्पतीही नामशेष झालेल्या आहेत. तर लागरी, (पाणकोंबडी), फेजन टेल जसाना हे मुठा नदीवर दिसणारे परदेशी तसेच देशी प्रजातीचे पक्षीही नाहीसे झाले आहेत. नदीपात्रात कचरा आणि राडारोडा टाकला जात असल्याने नदीत केवळ कावळे आणि घारीच दिसत आहेत.२00१ पर्यंत पुणे मनपा हद्दीमध्ये ४00 एमएलडी मैलापाण्याची निर्मिती होत होती. सध्या हे प्रमाण ८५0 एमएलडीवर पोहोचलेले आहे. केवळ ३५0 एमएलडी पाण्यावरच महापालिकेस शुध्दीकरण प्रक्रीया करणे शक्य झालेले आहे. त्यामुळे उर्वरीत पाणी थेट नदीत सोडले जात आहे. नैसर्गिक विघटन प्रक्रिया ठप्पमुठा नदीला वर्षात पावसाळ््यातील काही दिवसच पाणी असते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात निर्माण होणारे सांडपाणी नाले, तसेच डे्रनेज वाहिन्यांमधून थेट नदीत आल्याने नदीतील जीवसृष्टी टिकण्यासाठी आवश्यक असलेले बीओडी, सीओडी तसेच डीओचे प्रमाण प्रदूषण नियंत्रक महामंडळाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा कमी आहे. त्यामुळे नदीतील मासे, तसेच इतर वनस्पतींचे अस्तित्व महापालिकेच्या हद्दीत संपुष्टात आले आहेत.