शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
2
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
3
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
4
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
5
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
6
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
7
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
8
जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला
9
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 
10
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
11
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
12
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
13
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
14
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
15
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
16
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
17
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
18
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
19
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
20
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...

व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले ग काठेवाडी’चा पुण्यातील शेवटचा प्रयोग होणार शनिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:39 AM

व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले ग काठेवाडी’ हे नाटक १९६८ मध्ये रंगभूमीवर आले. या नाटकाचा पुण्यातील शेवटचा प्रयोग शनिवार दि. ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

ठळक मुद्देपुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झाले नाटकाच्या पुनर्निमितीतील काही मोजकेच प्रयोग दि. ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार पुण्यातील शेवटचा प्रयोग

पुणे : व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले ग काठेवाडी’ हे नाटक १९६८ मध्ये रंगभूमीवर आले. याच नाटकाची पुनर्निमिती सुनील बर्वे यांनी त्यांच्या हर्बेरियमच्या दुसऱ्या पर्वातून केली आहे. सुबक प्रस्तुत या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले असून, नेपथ्य प्रदीप मुळे यांचे आहे. या नाटकाचा लोकनाट्याचा बाज ओळखून त्यास साजेशी संगीतरचना राहुल रानडे यांनी केली आहे. पेशवाईच्या काळात घडलेल्या या काल्पनिक कथेमध्ये मातब्बर सरदार सर्जेराव शिंदे, काठेवाडीतील राजा जोरावर सिंग, जानकी, बकुळी आणि दिवाणजी यांच्यात घडणाऱ्या धम्माल विनोदी कथेची मांडणी, लोकशैली व आधुनिक रंगशैलीचे मिश्रण या नाटकात अतिशय प्रभावीपणे दिसते. या नाटकाच्या पुनर्निमितीतील काही मोजकेच प्रयोग पुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झाले. यामध्ये प्रमुख भूमिका निखिल रत्नपारखी, ललित प्रभाकर, अभिजित खांडकेकर, ईशा केसकर व मृण्मयी गोडबोले यांची आहे. या नाटकाचा पुण्यातील शेवटचा प्रयोग शनिवार दि. ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. रसिकांनी हे नाटक पाहण्याची शेवटची दुर्मिळ संधी न दवडता जास्तीत जास्त संख्येने या नाटकास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अभिनेते व निर्माते सुनील बर्वे यांनी केले आहे. 

टॅग्स :Puneपुणे