शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाची वाहतुक सुरक्षारक्षकाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : भरधाव वेगात आलेल्या वाहनांने वाहतूक नियमन करत असलेल्या सुरक्षारक्षकाला धडक दिल्याने झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : भरधाव वेगात आलेल्या वाहनांने वाहतूक नियमन करत असलेल्या सुरक्षारक्षकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत थेऊर फाटा येथे रविवारी पहाटे घडली.

दत्ताराम गोविंद अडागळे (वय ६३, रा. उरुळी कांचन, दातार कॉलनी, ता. हवेली) असे अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे पुतणे अविनाश आत्माराम अडागळे (वय ३४, रा. उरूळी कांचन, दातार कॉलनी, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडागळे हे गेल्या एक आठवड्यापासून कालिका सिक्युरीटीमध्ये काम करत होते. थेऊर फाटा ते लोणी कंद मार्ग दुरूस्तीचे काम चालू असल्याने त्या मार्गावरून मोठी वाहने जावू न देणे या कामावर कालिका सिक्युरीटीने त्यांना नेेेेमले होते. आणखी एकासह त्यांना रात्रपाळीसाठी नेमले होते. रविवारी राम बेनी सवारे (सध्या रा. थेऊर, मूळ रा. धौरहरा बांगर, तालुका बांधा, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) यांच्या सोबत थेऊर फाटा येथे वाहतुकीचे नियमन करत असताना पहाटे ४ च्या सुमारास अडागळे हे सोलापूर बाजूकडून पुणे बाजुकडे जाणारे महामार्गावरून जड वाहने थेऊर बाजुकडे न येता ती सरळ जावीत यासाठी थांबले होते. त्यावेळी सोलापूर बाजूकडून पुणेकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर लोणी काळभोर पोलीसांनी अपघात झाले ठिकाणी पाहणी केली असता तेथे त्यांना अपघात केलेले गाडीचा बंपर तुटलेला मिळून आला आहे.