Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:58 AM2024-05-27T11:58:39+5:302024-05-27T11:59:18+5:30

Pune Porsche Accident News : डॉ अजय तावरे रजेवर असतानाही त्याने रक्ताच्या नमुन्यांची फेरफार करण्यास सांगितली

vedant agadwal blood samples thrown in trash Others were sent to the lab the doctor's bing burst | Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले

Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले

Pune Porsche Accident News  - पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली आहे. यावेळी बाळाचे रक्ताचे नमुने कचरा पेटीत टाकले. आणि दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. 

डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या Forensic Medicine And Toxicology विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉक्टर श्रीहरी हलनोर हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. श्रीहरी हरलोल यांच्या विभागाने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले. डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. तरीही तावरे यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बाळाच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करायला सांगितली. डॉक्टरांनी या प्रकरणात ३ लाख लाच घेतल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. 

अमितेश कुमार म्हणाले, अपघात प्रकरणात 120 b, 467 , 201, 213 आणि 213 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर वर गुन्ह्याचा कटात सहभागी होणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, पुरावा नष्ट करणे या कलमाखाली अटक करण्यात आली आहे. ससून हॉस्पिटल ने घेतलेले नमुने बदलले गेले आहेत. आरोपीचे रक्त नमुने कचरा पेटीत टाकले. आणि दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. डॉ अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ श्रीहरी ने नमुने बदलले असल्याचे कुमार यांनी सांगितले आहे. 

औंध हॉस्पिटल मध्ये वडील आणि मुलगा दोघांचे नमुने पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आला आहे. त्यात दोघांचे रक्त मॅच होत आहे. ससून मधील रक्त मॅच झाले नाही. हा चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन डॉक्टर सह वडील विशाल अग्रवालचा समावेश आहे. डॉ विशाल अगरवाल याने डॉक्टर तावरे सोबत संपर्क साधला होता. हॉस्पिटल कडून आलेल्या अहवालात रक्तामध्ये मद्याचे अंश आढळून आले नाहीत. कारण 20 तासाने नमुने घेतले गेले. त्यात मद्य अंश आढळून आले नाहीत. याचा खटल्यावर काही परिणाम होणार नाही. कारण आरोपीने मद्य प्राशन केल्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत.

रक्ताचे नमुने घेणे आणि अहवाल मध्ये गडबड होऊ शकते याची शंका पहिल्याच दिवशी आली होती. त्यामुळेच औंध हॉस्पिटल ला DNA तपासणी साठी नमुने पाठवण्यात आले.  विशाल अगरवाल याचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केलेला आहे. ड्रायव्हरचे अपहरण करून मुलावरील गुन्हा  स्वतःच्या नावावर घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशाल अगरवाल याच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिल्या प्रकरणी तसेच दारू पिण्यास संमती दिल्या प्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाच्या मंजुरी नंतर त्याला नवीन प्रकरणात अटक करण्यात येईल

Web Title: vedant agadwal blood samples thrown in trash Others were sent to the lab the doctor's bing burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.