Vasant More: 'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरेंचं विधान, आज निर्णय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 02:58 PM2022-12-09T14:58:26+5:302022-12-09T15:01:54+5:30

अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Vasant More interacted with the media before meeting MNS leader Amit Thackeray. | Vasant More: 'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरेंचं विधान, आज निर्णय होणार?

Vasant More: 'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरेंचं विधान, आज निर्णय होणार?

googlenewsNext

मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. अजित पवारांच्या या ऑफरनंतर वसंत मोरे लवकरच मनसे पक्ष सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात जात होती. 

वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सांगितल्या आहेत, असं वसंत मोरेंनी सांगितलं होतं.

आगामी निवडणुकीत नवीन झेंडा हातात घेणार?; वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षनेतृत्वावरही बोलले!

वसंत मोरेंच्या या नाराजीनंतर आज मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी त्यांना बोलावून घेतलं होतं. अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अमित ठाकरे यांनी मला रात्री फोन केला होता आणि त्यांनी मला आज दुपारी भेटायला बोलावलं. मात्र अमित ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार, याबाबत मला कल्पना नसल्याचं वसंत मोरे म्हणाले. यासोबतच मी अजूनही 'राज'मार्गावरच आहे, असंही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अमित ठाकरे वसंत मोरेंसोबत कोणत्या विषयावर चर्चा करणार?, वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यात अमित ठाकरे यशस्वी होणार का?, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, वसंत मोरेंनी जाहीर नाराजी बोलावून दाखवल्यानंतर मनसेचे पुण्यातील नेते बाबू वागस्कर यांनी सदर प्रकणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. वसंत मोरेंनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती बाबू वागस्कर यांनी दिली. वसंत मोरे सातत्याने पक्षाची बदनामी होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत दोन दिवसांत विचार केला जाईल, असं मनसेनं ठरवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोन दिवस उलटूनही बाबू वागस्कर यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. 

'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत

मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, पण...

काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत, सध्या मी मनसे पक्षातच आहे. आगामी निवडणुकी जवळ येताय. त्यावेळी वसंत मोरे कुठे असतील, असा प्रश्न वसंत तात्यांना विचारला असता, मी सध्या कुठल्याही वाटेवर नाही. परंतु पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय. माझी कामे आणि सामान्या लोकांमधील असलेली प्रसिद्धी या लोकांना बघवत नाही, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला होता. तसेच राज ठाकरेंना वारंवार सांगूनही मला टाळण्यात येतंय. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी मला वाटलं राज ठाकरे पुण्यातील नेत्यांना काहीतरी बोलतील, मात्र असं काहीच झालं नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, परंतु इथल्या स्थानिक नेत्यांना आनंद होईल, असा दावा देखील वसंत मोरे यांनी केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Vasant More interacted with the media before meeting MNS leader Amit Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.